पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६५] नीतिविचार. मांडिली गोठी हन मोडेल ! वासिपेल कोणी उडेल । आइकोनि वोवांडिल। कोण्ही जरी ॥ तरि दुवाळी कोणा नोहावी । भंवई कवणाची नुचलावी। .... ऐसा भाव जीवीं । म्हणोनियां ॥ मग प्रार्थिला विपायें । जरि लोभे बोलो जाये तरि परिसतया होये । मायबाप ॥ कां नादब्रह्माचि मुसे आले । की गंगापय असळले। पतिव्रते आले । वार्धक्य जैसे॥ तैसे साच आणि मवाळं। मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ विरोधवादबलु। प्राणितापंढाळु। उपहास छळु । वर्मस्पर्श ॥ आटु वेगु विदाण । आशा शंका तारण। हे संन्यासिले अवगुण । जया वाचा॥ ज्ञा. १३. २६१-२७२. आतां मन तयाचे । सांगो म्हणों साचे । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ॥ काई शाखा नव्हे तरू । जळेचीण असे सागरु । तेज आणि तेजाकारु । आन काई ॥ अवयव आणि शरीर । हे वेगळाले काय कीर। की रस आणि नीर । सिनानी आथी ।। म्हणोनि हे जे सर्व । सांगितले बाह्यभाव। ते मनचि सावयव । ऐसे जाण ॥ १ भिईल. २ उपेक्षा करलि. ३ क्लेश. ४ ऐकणाऱ्याला. ५ आकारले. ६ उसळले. ७ मृदु. ८ मोजके. ९ विरुद्धवादाचे बळ. १० प्राण्यांस कासाविस करणे. ११ निंदा. १२ मर्मी लागणे, झोंबणे. १३ कठिण वाक्य. १४ जोराने बोलणे. १५ कपट, दगलबाजी. १६ संशय. १७ फसवणूक, ठकबाजी. १८ सूर्य. १९ खरोखर. २० वेगळाले.