पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६५] नीतिविचार.. तैसेनि मार्दव पाय । भूमीवरी न्यसीत जाय। लागती तेथ होय । जीवां सुख। .. ज्ञा. १३. २४१-२५५... किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी। करही देखसी । तैसेचि ते ॥ तरि होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ। तैसे अयाचे हात । निर्व्यापार ॥ अक्षम आणि संन्यासिलें। कां निरिंधन आणि विझाले। मुकेनि घेतले । मौन जैसे ॥ तयापरी कांहीं । जयां करां करणे नाहीं। जे अकर्तयाच्या ठाई । बैसो येती॥ आसुडेल वारा । नख लागेल अंबरा। इया बुद्धि करां । चलो नेदी ॥ तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगते झाडावी। पशुपक्ष्यां दावावी । त्रासमुद्रा॥ इया केउतिया गोठी । नावडे दंड काठी। मग शस्त्राचे किरीटी । बोलणे के ॥ लीलाकमले खेळणे । कां पुष्पमाळा झेलणे । न करी म्हणे गोफणे । ऐसे होईल ॥ हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी। नखांची गुंडाळीं । बोटांवरी ॥ तव करणे याचाचि अभाव । परि ऐसाही पडे डाव । तरि हातां हाचि सराव । जे जोडिजती ॥ कां नाभिकारा उचलिजे । हात पडिलियां देइजे। ना तरि आर्तात स्पर्शिजे । अळुमाळ ॥ १ ठेवीत. २ हिसडेल, झटका बसेल. ३ संवय. ४ हळूच..