पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ LA ६६४] नीतिविचार. ६४. अदमित्व. तरि अदभित्व ऐसें । लोभियाचे मन जैसे। जीव जावो परी नुमसे। ठेविला ठावो॥ तया परी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं। परि सुकृत न प्रकटी। आंगे बोलें ॥ खंडाणे आला पान्हा । पळवी जेविं अर्जुना। का लपवी पण्यांगना । वडिलपण ॥ आढ्य आतुडे अंडवीं । मग आढ्यता जेविं हारवी। नातरी कुळवधु लपवी। अवयवांत ॥ ना ना कृषीवळ आपुले। पांघुरवीं पेरिले। तैसे झांकी निपजले । दानपुण्य ।। वरिवरि देहो न पूजी । लोकांते न रंजी। स्वधर्म वाग्ध्वजीं। बांधों नेणे॥...॥ . शरीरभोगाकडे । पाहतां कृपण आवडे । येन्हवीं धर्मविषयी थोडें । बहु न म्हणे ॥ घरी दिसे सांकड । देहींची आयती रोड । परि दानी जया हो । सुरतरूसी। किंबहुना स्वधर्मी थोर । अवसरी उदार। आत्मचर्चे चतुर । येहवीं वेडा॥ . केळीचे दळवाडे । हळू पोकळ आवडे । परि फळोनियां गाढे । रसाळ जैसें ॥ कां मेघाचे आंग झील । दिसे वारेनि जैसे जाईल। परि वर्षती नवल । घणवट ते ॥...॥ हे असो या चिन्हांचा | नटनाच ठायीं जयाच्या। जाण ज्ञान तयाच्या। हातां चढले॥ १ उघडा करीत नाहीं. २ लाथरी गाय. ३ वेश्या. ४ श्रीमान्, धनिक. ५ सांपडे. ६ अरण्यांत. ७ शेतकरी. ८ खुशामत करीत नाही. ९ सामग्री. १० पैज. ११ कल्पवृक्षाबरोवर. १२ स्वरूप. १३ हलकें..१४ उत्कर्ष.