पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५९] तत्त्वज्ञान. स्वेदजप्रभृति । वेगळाल्या भूतीं। जयाचिये अनुस्यूतीं । खोमणे नाहीं ॥...॥ बाल्यादि तिन्ही वयसीं । काया एकचि जैसी। तैसे आदिस्थितिग्रासी । अखंड जे ॥ सायंप्रातर्माध्यान्ह । होतां जातां दिनमान । जैसे कां गगन । पालटेना॥ अगा सृष्टीवेळे प्रियोत्तमा । जया नाम म्हणती ब्रह्मा। स्थिती जे विष्णुनामा । पात्र जाहाले। मग आकार हा हारपे । तेव्हां रुद्र जे म्हणिपे । ते ही गुणत्रय जेव्हां लोपें । तें जे शून्य ॥...॥ जे अग्नीचे दीपन। जे चंद्राचे जीवन । सूर्याचे नयन । देखिती जेणे ॥...॥ जे देखिलियाचिसवे । दृश्य द्रष्टा हे आघवे । एकवट कालवे । सामरस्य ॥...॥ जैसे सरलिया लेखे । आंख होती एक। तैसे साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥ ज्ञा. १३.९१५-९३८. ५९. ब्रह्मस्वरूपाचे अनिवर्णनीयत्व, आणि जाणितलेया वरौतें । काही करणे नाही जेथे। जाणणेचि तन्मयाते । आणी जयाचें ॥ जे जाणितलेयासाठीं । संसारा कानियां कांटी। जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥...॥ जे नाही म्हणों जाइजे । तंव विश्वाकारे देखिजे। आणि विश्वचि ऐसे म्हणिजे । तरि हे माया ॥...॥ .१ घामापासून उत्पन्न झालेले. २ अखंडतेंत. ३ कमीपणा, न्यूनता. ४ उत्पत्तीचे वेळेस. ५ हिशोब. ६ आंकडे. ७ वर. ८ कुंपण.