पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. ५७. अव्यक्तोपासक हेही मलाच मिळतात. आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोहंभावा। झोबती निरवयवा । अक्षरासी॥ मनाची नखी न लगे। जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे। इंद्रियां कीर जोगें। काय होईल ॥ . परि ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न सांपडे । व्यक्तीसी माजिवडे । कवणेही नोहे ॥ जया सर्वत्र सर्वपणे । सोही काळी असणे । जे पावनि चितवणे। हिंपुटी जाहले॥ जे होय ना नोहे । जे नाहीं ना आहे । ऐसे म्हणोनि उपाये । उपजतीचि ना॥ चे चळे ना ढळे । सरे ना मैळे । ते आपुलेनीचि बळे । आंगेविलें जिहीं ॥...॥ ऐसे जे समबुद्धी । मिळावया सोहंसिद्धी। आंगविताती निरर्वधी । योगदुर्गे॥ आपुलिया साटोवाटीं । शन्य घेती उठाउठीं। तेही मातेचि किरीटी । पावती गा॥ पांचूनि योगाचेनि बळे । अधिक काही मिळे। ऐसें नाहीं आँगळे । कष्टची तयां। ज्ञा. १२. ४०-५९. . ५८. ब्रह्मस्वरूपाची अखंडस्थिति. जे एक आंत बाहेरौं । जे एक जवळ दुरी। जे एक वांचूनि परी । दुजी नाहीं ॥...॥ १ नखें. २ कठीण. ३ मध्ये. ४ कष्टी. ५ स्वाधीन करून घेतले. ६ एकसारखें. ७ मोबदल्यांत. ८ अधिक. ९ प्रकार.