पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासीं। मग नुसंधेन देहेसीं । आपण असे॥ कां अजातपक्षिया जवळा । जीव ठेऊनि अंविसाळां। पक्षिणी अंतराळा- माजि जाय ॥ ना ना गाय चरे डोंगरौं । परि चित्त बांधले वत्से घरीं । तैसे प्रेम येथिचे करी । स्थानपति ॥ येरे वरिचिलेनी चित्ते । बाह्य सख्य सुखापरने। . भोगिजो का श्रीमूर्तीते। चतुर्भुज ॥ .. परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोल न विसरावा। जे इये रूपीहुनी सद्भावा । नेदावे निधों ॥ है कहीं नव्हतंचि देखिलें । म्हणोनि भय जे तुज उपजलें। ते सांडी एथ संचलें। असो दे प्रेम ॥.... आतां करूं तुजया सारिखे। ऐसे म्हणितले विश्वतोमुखे । . तरि मागील रूप सुखे । न्याहाळी पां तूं ॥ - ज्ञा. ११. ६ ०९-६३९. ५५. विश्वरूपाचे पुनः कृष्णरूप... ऐसे वाक्य बोलतखेवो । मागुता मनुष्य जाहला देवो। हे ना परि नवलावो । आवडीचा तिये॥ श्रीकृष्णचि कैवल्य उघडे । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढ़े। :: हातीं दिधले की नावडे । अर्जुनासी । वस्तु घेऊनि वाळिजे । जैसे रत्नासि दूषण ठेविजे । ना तरि कन्या पाहूनियां म्हणिजे । मना नये हे ॥.... तया विश्वरूपा येवढी दशा । करितां प्रीतीचा वाढ कैसा।। शेल दिधलीसे उपदेशा । किरीटीस देवें॥ m ...१ द्रव्याच्या ठेव्याजवळ. २ सड्या, एकट्या. ३ घरट्यांत. ४ आकाशांत. ५ पहा. ६. बोलतांक्षीच. ७ टाकावी. ८ उत्तम वांटा.