पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. खिलजीने मलीक काफरास ३०,००० घोडेस्वार देऊन रामदेवरावावर पाठविलें, व त्याचा पराजय करून त्यास दिल्लीस कैद करून नेले. रामदेवराव सहा महिने तेथें । राहून नंतर परत आला, व तो शके १२१ साली निवर्तला. देवगिरीचे राज्य शके १२४० पर्यंत कायमचें मुसलमानांच्या ताब्यांत गेलें नाहीं. २. आतां ज्ञानेश्वरकालीन वाड्मयाची परिस्थिति कशी होती ते आपण थोडक्यांत पाहूं. मकंदराज या नावाचा जो संतकवि होऊन गेला त्याने आपल्या 'विवेकासेंध' च्या अकराव्या अध्यायाच्या शेवटी "शके अकरा दाहोत्तरू । साधारण संवत्सरु,” मध्ये आपला ग्रंथ लिहिला असे सांगितले आहे. हाच महाराष्ट्रवाङ्मयांतील उपलब्ध असलेला वेदांतानुभवप्रधान पहिला ग्रंथ होय असे म्हणावयास हरकत नाही. मकंदराजाचा ‘परमामृत' हा ग्रंथही फारच उत्कृष्ट आहे; व त्यावरूनच कदाचित् ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव अगर अनुभवामृत हे नांव आपल्या ग्रंथास दिले असेल. या परमामृत ग्रंथांतील बाराव्या प्रकरणांत स्वानुभवसुखाचे फार बहारीनें वर्णन केले आहे. " स्वेदकंपादि उठती । अष्टसात्त्विक भाव प्रकटती। पावे साम्राज्यसंपत्ती। रंक जैसा" (१२. १); "परम सुखाचेनि भरे । एकहीं स्फूर्ति न स्कुरे । कार्यजाती विसरे । निमिण्यांत” (१२. १०); "गुरुसांप्रदायाची वाट । न धरितां करिशी प्रगट । तरी गुज घेऊनी चावट । होतील बहु" (१४. २१ ) वगैरे ओंव्या फारच चांगल्या आहेत. या ग्रंथाची भाषा थोडी बहुत आधुनिक दिसते. पण ग्रंथकारभेदामुळे भाषाही भिन्न होऊ शकतात, तथापि मकंदराजापेक्षा सुद्धा 'महानुभावपंथ' अगर 'महात्मापंथ' यांतील ग्रंथकारांच्या भाषाशैलीशी ज्ञानेश्वरांची भाषा फार जुळते. अलीकडे रा. विनायक लक्ष्मण भावे यांनी महानुभावपंथासंबंधी जी माहिती प्रसिद्ध केली आहे तीवरून पाहतां ज्ञानेश्वरीरचनेच्या पूर्वी भाषाशली व विचारशली कशी असावी याचे अनुमान आपल्यास काढता येण्याजोगे आहे. महानुभावपंथाचे सर्व ग्रंथ छापून निघावयास पाहिजेत; तथापि उपलब्ध असलेल्या माहितीवरून सुद्धा महाराष्ट्रभाषेच्या वाङ्मयांत महानुभाव पंथाने बरीच भर टाकिली आहे असे अनुमान काढले असतां वावगे होणार नाही. या महानुभाव पंथाचा उत्पादक चक्रधर यास शके ११८५ मध्ये संन्यासदीक्षा मिळाली, व शके ११९४ मध्ये तो हा प्रांत सोडून बद्रिकाश्रमी गेला. याचे जरी ग्रंथ प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत, तथापि त्याच्या शिण्यमंडळीपैकी पुष्कळांनी ग्रंथरचना करून ठेविली आहे. महींद्रभट या नांवाच्या त्याच्या शिष्याने ' सिद्धांत