पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६४७ तेथ राहोनि ठायोठिक । स्वप्रकाशे चोखे । अजत्व माझे देखे । आपुलियां डोळां ॥ मी आदिसी पर । सकळलोकमहेश्वर । ऐसिया माते जो नर । यापरी जाणे । तो पाषाणामाजि परिस । जैसा रसाआंत सिद्धरंस । तैसा मनुष्याआंत तो अंश । माझाचि जाण ॥ ते चालत ज्ञानाचे बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोभ। येर माणुसपण ते भांब । लौकिक भाग ॥...॥ तो आपभयेचि सांडिजे पापी । जैसा जळत चंदन सी। तोवं माते जाणे तो संकल्पी । वर्जूनि धापे ॥ ज्ञा. १०. ७२-८०. ४८. ईश्वरस्वरूपाचे ज्ञान म्हणजेच ईश्वराच्या सर्व विभूतींचें ज्ञान होय. जैसी आधवींचि नक्षत्रे चावी । ऐसी चाड उपजेल जै जीवीं । ते गगनाची बांधावीं । लोथ जेवीं ॥ कांपृथ्वीये परमाणूंचा उगाणां ध्यावा । तरि भूगोलाँच कांखे सुवावा। तैसा विस्तार माझा पाहावा । तरि जाणावे माते ॥ जैसे शाखांसी फूल फळ । ऐकिहळां वेटाळू म्हणिजे सकळ । तरि उपडूनियां मूळ । जेविं हाती घे ॥ तेविं माझे विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजती अशेष । तरि स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझे ॥ ये हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती। म्हणोनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥ - ज्ञा. १०.२५९-२६३. १ ठिकाणाच्या ठिकाणी स्थिर. २ अमृत. ३ अंकुर. ४ भास. ५ कल्पना कडून. ६ वगळून. ७ घेतला जातो. ८ मोट, गांठोडें. ९ झाडा. १० पृथ्वी. ११ घालावी. १२ शाखांसह. १३ एकदम.