पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. कां जे महर्षी आणि देवा । येरां भूतेजातां सर्वा। मीचि आदि म्हणोनि पांडवा । अवघड जाणतां ॥ उतरले उदक पर्वत वळधे । जरि झाड वाढत मुळी लागे। तरि मियां जालेनि जगें । जाणिजे मात ॥ ज्ञा. १०.६५-६५. ४५. ज्ञान हे ईश्वरापुढे अज्ञान होय. अर्जुना माझे ठायीं । आपणवीण सौरस नाहीं । मी उपचारे कवणाही । नाकळे गा॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेचि उणे । आम्ही जाहालो ऐसे जो म्हणे। तो कांहींचि नव्हे ॥...॥ पाहे पां जाणिवेचेनि बळे । कोण्ही वेदांपासूनि असे आगळे । की शेषाहूनि तोडाळे । बोलके आथी॥ तोही आंथरुणा तळवटी दडे । येरूँ नेति नेति म्हणोनि बटुडे। ... एथ सनकादिक वेडे । पिसे जाहाले॥ करितां तापसांची कडसणी | कवण जवळां ठेविजे शूळपाणी। तोहि अभिमान सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥...॥ म्हणोनि थोरपण पैन्हां सांडिजे। एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे। ॐ जगा धाकुट होइजे । तें जवळीक माझी॥ अगा सहस्रकिरणाचिये दिठी-1 पुढां चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत कां हुटहुँटी । आपुलेनि तेजें ॥...॥ यालागी शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचे लोण उतरिजे । संपत्तिमद सांडिजे । कुरवंडी करूनी ॥ ज्ञा. ९. ३६७.-३८१ १ आश्रय करील. २ आनंद, योग्यता. ३ स्वाधीन होत नाही. ४ संपन्नता. ५ श्रेष्ठं. ६ बोलकें. ७ दुसरा ( येथे, वेद)..८. मागे सरतो. ९ निवड, विचार. १० शंकर. ११ चरणतीर्थ. १२ पलीकडे. १३ ज्ञातेपणाचा अभिमान. १४ सूर्य. १५ कांजवा. १६ घमेंड करावी. १७ निंबलोण करणे, उतरून टाकणे.