पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४४] तत्त्वज्ञान... ४९ ४३. जगास परतें सारून ईश्वास पाहता येणे शक्य नाही. आतां शरीरे बहुते । देखोनि न भेद हो चित्ते। जे मनबुद्धयादि भूते । एकेचि येथे ॥ हां गा एकचि देहीं । काय अनारिसे अवयव नाहीं। तेवीं विचित्र विश्व पाहीं। एकचि हे ॥ मैं उंचा नीचा डाहळिया। विषमा वेगळालिया। येकचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥...॥ नाना कल्लोळपरंपरा। संतती जैसी सागरा । आम्हां आणि चराचरा । संबंध तैसा ॥ म्हणौनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेवि मी गा सकळ । संबंध वाव ॥ जालेनि जगे मी झांके । तरि जगत्वे कोण फांके। किळेवरी माणिक । लोपिजे काई ॥...॥ म्हणौनि जग परोते । सारूनि पाहिजे माते। तैसा नोहे उखिते । आघवे मीचि ॥ ज्ञा. १४. ११८-१२८. ४४. ईश्वराच्या रूपाचे याथातथ्यरीतीने अज्ञेयत्व. मी कवण पां केतुला। कवणाचा के जाहला। या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥ अगा उदरींचागर्भ जैसा । न देखे आपुलिया मायेची वयाँ। मी आघवेयां देवां तैसा । नेणवे कांहीं ॥ आणि जळचरां उदधीचे मान । मशका नोलांडवेचि गगन। तेवि महर्षांचे ज्ञान । न देखचि माते॥ N १ भिन्नभिन्न. २ खोटा. ३ प्रभेनें. ४ पलीकडे. ५ संपूर्ण. ६ निश्चय. ७ वय. ८ चिलट.