पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. प्रस्तावना. . .. - - १. श्रीज्ञानेश्वरांच्या चरित्राचा विचार करण्याच्या अगोदर तीन गोष्टींचा आपध्यास येथे अल्पमात्र विचार कर्तव्य आहे. (१) ज्ञानेश्वरकालीन ऐतिहासिक स्थिति; ( २ ) ज्ञानेश्वरकालीन वाङ्मय स्थिति; (3) ज्ञानेश्वरकालीन धार्मिक स्थिति. ज्ञानेश्वरकालचे महाराष्ट्र म्हणजे एक सुखसंपन्न महाराष्ट्र होते. भिल्लमापासून चालत आलेल्या यादववंशांत निर्माण झालेला रामदेवराव हा देवगिरी येथे राज्य करीत होता. ज्ञानेश्वरांनी त्याचे " यदुवंशाचा विलास, सकळकळांचा निधि, व न्यायाने पोसणारा " असा गौरवाने उल्लेख केला आहे ( क्र. १). ज्ञानेश्वरकाली अद्याप मुसलमानांची स्वारी महाराष्ट्रावर झाली नव्हती. नानापंथ, नानामतें ही जरी निर्माण झाली होती, तरी ती हिंदुधर्मामधीलच होती. रामदेवरावाचा हेमाडपंत या नावाचा एक मोठा मुत्सद्दी, ब हुषार कारभारी होता. त्याच्या अमदानींत सर्व कलांना, विद्यांना, व धर्मालाही फार उत्तेजन मिळाले. रामदेवरावाची कारकीर्द शके ११९३ पासून शके १२६१ पर्यंत झाली. ज्ञानेश्वरांचा जन्म व रामदेवाची कारकीर्द ही जवळजवळ समकालीनच होती असे म्हटले तरी चालेल. ज्ञानेश्वरांनी आपला ज्ञानेश्वरी ग्रंथ " शके बाराशतें चारोत्तरें " मध्ये लिहिला हे प्रसिद्धच आहे. ज्ञानेश्वरांचा समाधिकाल व्हावयाच्या अगोदर म्हणजे शके १२१८ च्या अगोदर दोनच वर्ष, म्हणजे शके १२१६ मध्ये, अल्लाउद्दीन खिलजी हा देवगिरीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने अचलपूर अगर एलिचपूर येथपर्यंत आपले सैन्य घेऊन का; परंतु रामदेवरवाने नजराणा देऊन त्यास परत पाठविले. म्हणजे, ज्ञानेश्वरांचर किाल होईपर्यंत अद्याप मुसलमानांचा अंमल दक्षिणेत मुळीच बसला नव्हता. ज्ञानश्वरांच्या समाधीनंतर दहा वर्षांनी म्हणजे शके १२२.८ मध्ये अल्लाउद्दीन ।