पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याला व्यवस्था जितकी जबाबदार आहे, तितकेच स्वतः शिक्षकही ! अजून तरी शाळा, कॉलेज, विद्यापीठातून प्रयोगशील, उपक्रमशील, संशोधक शिक्षकांनी ते करतील ती पूर्व असं स्वातंत्र्य आहे. अगदी सोपविलेलं काम अंगाला न लागता, खरचटता करायचं म्हटलं तरी भरपूर काही करता येणं शक्य असतं नि आहे. माझे एक शिक्षक होते. प्राचार्य ए. के. भागवत. ते शिक्षकांना नेहमी एक वाक्य सांगायचे. ‘पाट्याच टाका पण भरून टाका' आज शिक्षकी पेशा धंद्याकडे झुकू लागला आहे तो तासांच्या टोलांमधील टोलवाटोलवीमुळे! आपल्याकडे शासनाची अनुकंपा, संघटनांची हक्ककेंद्री बांधणी, नोकरीतील सुरक्षा नि शाश्वती यांमुळे सरकारी नोकऱ्या, बँका, विमा, शाळा, विद्यापीठे सर्वत्र एकप्रकारची बेफिकीरी वाढली आहे.
 न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन कॉलेज, फर्गुसन महाविद्यालय, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था यातून वि. वि. चिपळूणकर, आगरकर, टिळक, कर्वे, भाऊराव पाटील यांनी तसेच म. फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू, विठ्ठल रामजी शिंदे प्रभृतींनी महाराष्ट्रात शिक्षक नि शिक्षणाची हिमालयाएवढी परंपरा निर्माण केली असता तिचं रूपांतर सावलीत का व्हावं? शिक्षणाची झेड. पी. का व्हावी? याचा शोध घेताना लक्षात येतं की आजच्या शिक्षकांनी धर्मावर सोमवार करत जगायचं ठरवलं आहे. काही न करता जगणं हे देशाला जसं परवडणार नाही तसं ते स्वतःच्या जीवनातही सोसण्यासारखं राहीलं नाही. धर्मकर्म संयोग म्हणून जे या पेशात आले त्यांनी आता स्वतःहून स्वतःस धर्मकाट्यावर पारखून घ्यायला हवं, स्वयंमूल्यमापनासारखं दुसरं परिमाण नाही.
 श्री. एम.डी. मधभावे अब्दुललाट येथून इचलकरंजीस रोज पायी चालत येऊन शिकले. पहिला तास त्यांना कधीच मिळाला नाही. म्हणून त्यांना गणित सोडून एस.एस.सी. व्हावं लागलं. सी.पी.एड्. झाले. कोकणात शिक्षण झाले. तिथे पैसा फंड जमवून मुलांना पैसे-मासे खाऊ घालून रिझल्ट वाढविले! इथे देशभूषणमध्ये आल्यावर घिसाड गल्ली, अकबर मोहल्ल्यातील न शिकणाऱ्या मुलांना नि घरी बसलेल्या मुलींना शाळेत आणलं, शिकवलं. ते मुख्याध्यापक झाले, पण तासावर जायचं त्यांनी थांबविलं नाही. मुख्याध्यापक झाले, पण कधी झेड.पी.त गेले नाहीत. त्यांना आदर्श शिक्षकाचा कोणताही पुरस्कार मिळाला नाही. कारण शिक्षक होणे हा त्यांचा ‘धर्म होता. ते नुसते मधभावे नव्हते. सद्भावे होते. शिक्षकाचं सद्भावी होणं ही काळाची गरज आहे.

***

जाणिवांची आरास/७0