पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/166

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


स्वर्ग हवा तर


    माझ्या निरीक्षणातील भारतीय मी नोंदवत आहे. हे सर्वसाधारण भारतीय होत. यातील प्रत्येक प्रकारात सन्माननीय अपवाद आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आपणास रस्त्यात पडलेला रुपया ओलांडून जाता येत नाही. आपण तो बिनदिक्कतपणे इकडे तिकडे न पाहता उचलतो. आपणास सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे जीवावर येते. ट्राफिक सिग्नल असलेल्या चौकात आपण किती उतावीळ असतो! समोरचा नियम पाळणारा असेल तर चक्क हॉर्न वाजवून त्यालाही नियम मोडायला भाग पाडतो. ओळ पाळणे आपणास कमीपणाचे वाटते. म्हणून जिथे ओळ असते, तिथे घुसखोरी अगदी होतेच होते. शिक्षणाचा व आपल्या जगण्याचा संबंध कमी. शिक्षण आपल्या लेखी मिळकतीचे साधन व माध्यम! घरी पुस्तके अपवादानेच. घर म्हणजे भौतिक संपन्न वस्तू व साधनांचे संग्रहालय, वेळेचा अपव्यय करावा तर तो आपणच. तासन्तास गप्पा, टीव्ही पाहणे, भटकणे, चैन करणे यात आपणास काही गैर वाटत नाही.
   पैसे घेऊन मतदान करणे तर अनेकांची वृत्तीच होऊन गेली आहे. कार्यालयातले कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही, याची आपणास खात्री असल्याने लाच देणे, घेणे हा गुन्हा न वाटता तो आपल्याला शिष्टाचार वाटतो. पेट्रोल पंपावर आपण जितके पैसे मोजतो, तितके पेट्रोल आपल्याला बहुतेकदा मिळतच नाही आणि आपण तसा आग्रहसुद्धा धरत

नाही.

   बन्याचदा रिक्षावाले मीटरपेक्षा अधिक पैसे मागतात नि आपण देतो. ‘अडला नारायण' म्हणून आपला व्यवहार पदोपदी. ‘परस्त्री मातेसमान' हा


             जाणिवांची आरास/१६५