पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





लीन संप्रदाय


        मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, शिकत, स्वावलंबी झालो. या प्रवासात अनेकांचे साहाय्य झाले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात निरंतर कृतज्ञतेचा भाव होता नि आहे. पण मी असे अनुभवले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत साहाय्य करणारी माणसं ते निरपेक्षपणे करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात.
      अलीकडे मी काय पाहतो, तर नोकरदार दिवसेंदिवस दीन होताहेत. कारखाने, बँका, उद्योग, व्यापारात हे मी समजू शकतोद्धपण त्याहीपेक्षा गैर मला सार्वजनिक पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत अस्वस्थ करतो. ‘शिक्षकदिनी संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यांपर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून आम्ही सर्वांचा सत्कार करतो!' असे सांगून शिक्षक दिनी एका संस्थेने मला व्याख्यानाला आमंत्रित केले; पण मी तेथे काय पाहिले तर एक छापील प्रमाणपत्र व फूल अध्यक्षांच्या हस्ते सर्वांना दिले. संस्थेचे अध्यक्ष असल्याने प्रचार्यांपासून शिपायापर्यंत सर्वजण अध्यक्षांच्या पुढे नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.
     समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. सहकारी साखर कारखाने, डेअरी, बँका, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सर्वत्र हा सार्वजनिक सोपस्कार बनत त्याचे रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. ‘खाल मान्या, हो



                         जाणिवांची आरास/१६३