पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कर के देखो...


       मानवी उत्क्रांतीच्या काळात आपली शेपूट झडून गेली. त्यामुळे जात झडून जाणे सहजशक्य आहे, असे मला वाटते. जात निर्मूलनाबाबत आपण गंभीर असू तर छोट्या छोट्या कृती करणे शक्य आहे. नव्या पिढीच्या नोंदी जात रकाना काढून टाकणे, रकाना पाहिला तर तिथे ‘मनुष्य' अशी नोंद । करणे. याचाच विस्तार करून ‘मानव धर्म' लिहून पूर्ण करणे उचित ठरेल. कोणत्याही व्यापक बदलाची सुरुवात अभिलेख नोंद असते. मग जेवढे जातीय परिघातले व्यवहार टाळणे म्हणजे अस्पृश्यता न मानणे, जातीत विवाह न करणे, जातीय संघटनांचे सदस्य न होणे, आंतरराष्ट्रीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय व्यवहार समर्थन व सकारात्मक कृती करणे, आपले विवाह आंतरव्यवहारी होतील असे पाहणे. रोटी-बेटी व्यवहारातूनच जात, धर्म निर्मूलन शक्य आहे. 
      आपण व आपला व्यवहार जातीय होतो का ते पाहायच्या छोट्या छोट्या कसोट्या आहेत. तुम्ही जातीय कर्मकांड मिरवता का? तिला धर्मीय जोड असते का? जाती, धर्माची चिन्हे, प्रतिके आपण गळ्यात, मनात मिरवतो का? जात, धर्म विशिष्ट समाजातच तुमचा वावर असतो का? तुमचे निवासस्थान जातीय वा धार्मिक विशेष वसाहतीत आहे का? पूर्वापार असणे, वडिलार्जित असणे भाग अलाहिदा, निवडीत स्वातंत्र्य असते तेव्हा आपण व्यापकता, उदारता दाखवतो, पाळतो का? आपल्या रोजच्या संपर्क, संवादात आपण भिन्न जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत कसोटीवर बहुभाषी, बहसांस्कृतिक, बहप्रांतीय भान बाळगतो का? त्यांची आणखी चपखल रोजच्या कृतीतील गोष्ट तपासायची, पडताळायची म्हणजे


                         जाणिवांची आरास/१६१