पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





भारतीय असणं


      माणूस एखाद्या देशाचा नागरिक असतो म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा मी नेहमी हक्काच्या परिघात फिरताना अनुभवतो. हक्काच्या लढाईइतकीच कर्तव्य भावना महत्त्वाची. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात तर कर्तव्यपरायणता अधिक महत्त्वाची. कारण भारत हा वैविध्यपूर्ण देश. ज्या देशात एकवंशी समाज असतो, तिथं त्या राष्ट्राचं एकात्म होणे भारताच्या तुलनेने सोपे असते. त्या राष्ट्रामध्येही छोटे छोटे भेद असतातच; पण भारतातील नागरिकत्वास वेगळे परिमाण आहे. हा देश आकारलाच मुळी विविध वंशांतून. निग्रो, पठण, द्रवीड, आर्य, ग्रीक, शक, हूण, कुशाण, कंगोल, मुस्लिम, तुर्क असे कितीतरी प्रकारचे, वंशाचे लोक भारतात आले. त्यांच्यात शतकानुशतके रोटी-बेटी व्यवहार होत राहिले. म्हणून भारतात स्थापना व विकासकाळापासून बहुवंशीय समाज दिसून येतो. बहुवंशातून बहुवर्ण साकारले. वर्णाचे जातीत रूपांतर झाले. आज आपल्या भारतीय समाजात विविध जाती, पोटजाती दिसतात त्याचे मूळ कारण आपलं बहुवंशीय असणे आहे. तीच गोष्ट धर्माची. हिंदू, मुस्लिम, जैन, बुद्ध, पारशी, शीख असे धर्मवैविध्यही इतिहासकाळापासून इथे नांदतेय. भाषा, संस्कृती, सण, दागिने, पोशाख, चालीरितींचे वैविध्य इथल्या आसेतू हिमालय पसरलेल्या निसर्गातून पाझरलंय. म्हणून इथे विविधतेतही एकता दिसून येते. इथली एकता सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे.
     भारतावर इतिहासकाळापासून अनेक स्वाच्या, आक्रमणं झाली. अनेकांनी हा देश विशिष्ट धर्म, संप्रदायाचा बनविण्याचे प्रयत्न केले; पण त्याला यश


                         जाणिवांची आरास/१५५