पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जगणं


     माझ्या लहानपणी व माझी मुले लहान असतानाही रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाईलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता. मात्र, हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतंय. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मात्र, मोबाईलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. लहानपणी हा खुळखुळा व्हिडिओ गेम्सचा नाद लावतो. ते गेम त्याला गाणी, गोष्टी, खेळ शिकवतात. थोडा मोठा झाल्यावर हा खुळखुळा त्याला फोन करायला शिकवतो. पाचवीत गेला की, तो व्हॉट्स अॅप वापरू लागतो. आठवीला गेला की, ‘मिस कॉल देऊ लागतो. अकरावीत व्हिडिओ क्लिप बघू आणि पाठवू लागतो. कॉलेजला गेली की, युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते. माणूस मिळवू लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक'वर बाता मारू लागतो. लग्न झाले की फेक अकाऊंटवरून हृदय नि मन मोकळं करत राहतो. कधी लाइक, कधी कॉमेंट असं व्यक्त-अव्यक्त आभासी जगात जगू लागतो. गुड मॉर्निग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम्स, काँग्रेट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडेच! आभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना मी अनेकदा पाहतो.
    या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. या संस्कृतीचे भाकित अॅरिस्टॉटल यांनी केले होते. अगदी अलीकडेच बाबा


                        जाणिवांची आरास/१४९