पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






माणूस

      माणूस हा मला नेहमी हिमनगासारखा वाटत आला आहे. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताणतणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं... त्याचा शोध, वेध घेऊ पहाल तर कठीण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरुष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बॉस, नेता काहीही असतो. म्हणजे एकच पुरुष एका जन्मात असंख्य भूमिका निभावतो. तीच गोष्ट स्त्रीची. ती मुलगी, मावशी, आई, ताई, आत्या, शिष्या, सहकारी, सचिव, वरिष्ठ, नर्तकी, अभिनेत्री, वैज्ञानिक असू शकते. पुरुष किंवा स्त्री एक मनुष्य म्हणून किती चेहरे, मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यामुळे, एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुस-या एखाद्या व्यक्तीस अप्रिय ठरतो. माहेरची मुलगी सासरी गेली की ती तिथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी ती बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी, संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. ते समाजाने त्याच्यावर लादलेलं पारंपरिक ओझं असतं. आपल्याकडे संबंधाच्या भूमिकांनुसार आपलं वागणं ठरतं. सारे प्रश्न त्यातूनच निर्माण होतात.
      माणसाचं वागणं शोभादर्शकातल्या प्रतिमांसारखं असतं, असं मला वाटतं. म्हणजे एकाच वेळी शोभायमान परंतु भ्रामक, जागा बदलली की,
                   


                        जाणिवांची आरास/१४७