पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

दैन्य हटविणारा अगस्ती

      माणसं दोन प्रकारे जगत असतात, असा माझा अनुभव आहे. एक स्वतःसाठी जगणं आणि दुसच्यासाठी. दुसन्यासाठी जगणं यामागे दिव्य प्रेरणा, परहित भाव, ध्यास असतो. त्यासाठी तुम्हाला प्रलोभनांचा त्याग करावा लागतो. मोहाची अनेक वळणं ठिकाणं सोडावी लागतात. 'मी'च्या पलीकडे सतत विचार करावा लागतो. ही सोपी गोष्ट नसते. हे सारं

आठवायचं कारण बाबा आमटे. ते नुकतेच आपल्यातून निघून गेले. त्यांनी केलेलं अनाथ, निराधार, अंध, कुष्ठपीडितांचं पुनर्वसन कार्य केवळ अभिनंदनीय नव्हतं तर अनुकरणीय होतं.

       ऐन तारुण्यातील काही काळ मी त्यांच्या सहवासात घालवला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वीस वर्ष अनाथांचे पुनर्वसन व संगोपन कार्य मी केलं आहे. त्यांच्या कार्याची माहिती मला त्यांच्या पुनर्वसवन पद्धतीत आढळते. माणसाचं भीक मागणं ही काही स्वेच्छेची गोष्ट नसते. परिस्थिती माणसास लाचार बनवते. लाचारी ही त्याचा जीवन व जगण्याचा जाहीर पराभव असतो. असं जिवंत मरण जगणाच्या शेकडो माणसांना बाबा आमटे यांनी जगण्याचं बळ दिलं. हाताला काम दिलं. कामातून पैसे मिळाले. त्या पैशातून त्यांना त्यांच्या जगण्याचा पैस, आधार मिळाला.
     महात्मा गांधी, विनोबा, मार्क्स, सानेगुरूजी, प्रॉमिथिअस हे त्यांचे आदर्श होते. परहितार्थ स्वतः झोकून देण्याची फकिरी जे करू शकतात, तेच जग बदलतात. बाबा आमटे दैन्य हटविणारे अगस्ती होते. म्हणून ते अनाथांसाठी 'गोकुळ', अंधांसाठी ‘आनंद निकेतन', कुष्ठांसाठी ‘आनंदवन', वृद्धांसाठी ‘उत्तरायण' देऊ शकले. आपल्या जगण्याच्या हिशोबाची एक

जाणिवांची आरास/१३३