पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


________________

        स्त्री-पुरुष संबंध एक सहज उद्गार आहे. तो काही केवळ पुरुषी आविष्कार नव्हे. खरं तर स्त्री-पुरुषांतील ताणतणाव कमी करण्याचं ते एक निमित्त आहे. तो काही ‘मर्दानगी का शौक (पुरुषार्थी छंद) नव्हे. त्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. एफ कुस्ती आहे.
        विवाहमान्य संबंधात संतती टाळण्याचं साधन, मूल होऊ न देण्याचा उपाय, मुलांतील अंतर वाढवायचा उपचार, गर्भधारणा रोखणारं साधन, लोकसंख्या नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय ही तत्त्व गृहीत धरून या जाहिराती हव्यात. एका सरकारी जाहिरातीत मागं केव्हा तरी एस. टी. मागं लिहिलेलं असायचं की, “जवानी की दिवानगी का उपाय.' खरं तर बचने का उपाय हवा. सामाजिक गांभीर्यानं लिहायचं तर ‘जवानी मे दिवानगी बेवकूफी है।' (तारुण्यातील बेजबाबदारपणा मूर्खता आहे.) यौन संबंध जब जब, कंडोम तब तब' असं लिहून आपण यौन संबंध वाढवण्यास प्रोत्साहन देतो, हे आपल्या लक्षातच येत नाही, लिहायला असं हवं की, शक्यतो यौन संबंध टाळा, अटळ वाटल्यास निरोध वापरा. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध अनैतिक आहेत. तो सामाजिक अपराध आहे त्यातून होणाच्या गर्भधारणेतून सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यातून निर्माण होणारी गर्भधारणा, अपत्य सामाजिक अपराध ठरतो. गाफील क्षणांवर नियंत्रणाचा उपाय म्हणून संतती निरोधक साधने होत, अशा अंगाने प्रबोधनाचा उपाय म्हणून जाहिरातीकडे पाहायला हवं. आरोग्य खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती नियमनाची साधने खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती । नियमनाची साधने निर्माण करणा-या कंपन्या (कामसूत्र, माला डी, निरोध,आयपिल्स, ड्युरेक्स, मूडस्) यांनी आता 'मी तुला चंद्र दाखवतो म्हणालो होतो' असं सांगण्याऐवजी 'मी तुला म्हणालो होतो ना, आपले पाय कायम जमिनीवर हवेत!' म्हणायला शिकलं पाहिजे. लैंगिक संबंधातील भावसाक्षरता, स्त्री-पुरुष समानता, विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध : सामाजिक अपराध या अंगांनीच जाहिराती व्हायला हव्यात. आजवर आपण केवळ शारीरिक एड्सचाच विचार करत राहिल्याने आपला सामाजिक एड्स कोणत्या टोकाला जाऊन भिडला आहे, हे लक्षातच आले नाही. घरोघरी राम, सीता हवेत की। दुष्यन्त-शकुंतला? सती सावित्री हवी की विश्वामित्र? कर्ण-कुंती हवी की यशोधरा-राहुल?

जाणिवांची आरास/१३०