पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 वा लक्षवेधी नाही यासंदर्भात युरोपचा आदर्श घ्यायला हवा. आपली व्यवस्थापनाइतकेच ते आपत्तीपूर्व नियोजनावर कार्य, संशोधन करतात.

  मोटार हे प्रतिष्ठेचे प्रतीक न राहता उपयोगी साधन गतिमान दळणवळणाचे सुखद उपकरण म्हणून ते विकसित होणार आहे, हे लक्षात घेऊन योजना हवी पार्किंगचा प्रश्न बिकट होणार आहे. त्यामुळे त्यासंदर्भात नवे धोरण त्वरितं अगिकारावे लागेल.
  रस्ता चालणाऱ्याचा की चालवणाच्याचा असे एक नवे वैचारिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न उभा करणारे वादळ घेऊन येणारी 'नॅनो' ही नव्या सामाजिक, आर्थिक वादळाचीही नांदी ठरणार हे उघड आहे. म्हणून आपण आता सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातील कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. तिथे कायद्यातच सुविधा व सेवाचा अंतर्भाव असतो, आपल्याकडे पण तसे व्हायला हवे.
    


           जाणिवांची आरास/१२५