पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/117

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 उजाडलं तरी बिघडणार नाही; पण भगाडण्याची धांदल थोडी मंदच हवी. इमारत रंगवणं रात्रीत होतं, पण पिकासोचं चित्र तयार व्हायला कधी-कधी वर्ष गेली. सारवणावरची रांगोळी नि प्लास्टिक छापाची चिकटणारी स्टीकर रांगोळी यातला फरक हा निसर्ग नि कृत्रिमतेचं अंतर स्पष्ट करणारा आहे. बर्गर की भाकरी? पूर्व की पश्चिम? असं द्वंद्व माझ्या मनात नाही. मला पूर्व आणि पश्चिमेच्या समन्वयानं जाता, जगता येतं की नाही असं विचाराचंय. थोडा विचार करा म्हणजे कळेल की घाईचा घात हा भरून न येणारा तोटा असतो. उलटपक्षी संयमी चाल ही उशिरा यश देणारी असली तरी ती चिरंजीवी, चिरस्थायी असते. हे आपण लक्षात ठेवायला हवं. सन २००७ कडे जात असताना माझ्या असं लक्षात आलंय की गेल्या सहा वर्षांत आपणास विस्तारभयानं पछाडलंय.

◼◼

जाणिवांची आरास/११६