Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना शैलशिखा, आवितथ, वरयुवती, वंशदल, भ्रमदपद, युवाणिनी, वाणिनी, वीरललिता, समदविलासिनी, गरुडरुत, नन्दन, नरेन्द्र, कामलता, शशिवदना, भद्रक, अश्वललित, ललितविक्रम आणि सुधाकलश' या पश्खवीस वृत्तांची परस्पराशी तुलना करून पहातां हीं अष्टमात्रक आवर्तनाचीं आहेत, पहिला गण (- ७ ~ -) वा (७ ७ ७ ७ -) असा षण्मात्रक आहे, आणि पुढील गणांत (५ - ७ ७ ७ - ) या गणाचें प्राचुर्य आहे हें ध्यानांत यायला वेळ लागत नाही. आता पिङ्गलाने साङ्गितलेल्या वृत्तांपुरताच विचार केला तर असें दिसून येतें की वंशपत्रपतित (वंशदल), शशिवदना, भद्रक आणि अश्वललित या चार वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साड्गतो; पण नवमलिनी, ऋषभगजविलसित. शैलाशखा, आवितथ आणि वरयुवती या वृत्तांत तो द्वितीय आवर्तनाच्या अन्तीं यति साड्गत नाही. वरयुवती आणि वंशपत्रपतित या दोन वृत्तांत विलक्षण साम्य आहे; पण ओका वृत्तांत तो यति योग्य ठिकाणीं साड्गतो तर दुस-या वृत्तांत तो यतिच साड्गत नाही! अॅकन्दरीने विचार करितां नवमालिनी, ऋषभगजविलसित, शैलशिखा, कोकिलक या वृत्तात पिङ्गलाने साङ्गितलेली यतिस्थानें चुकीचीं वाटतात. अष्टमात्रक आवर्तनाच्या वृत्तांत जेथे चरणांत चार आवर्तनें असतात तेथे दुस-या आवर्तनाच्या अन्तीं खटका अगदी स्वाभाविकपणें येतो. तेथे ओका मात्रेचाहि विराम नसती, तथापि तें यतिस्थान होतें, आणि तेथे पदसमाप्ति अवश्य वाटते. जेथे केवळ खटका आहे तें जर यतिस्थान मानावें लागतें तर जेथे दोन मात्रांचा विराम आहे तें यतिस्थान मानलेंच पाहिजे हें झुघड आहे. पहिल्या आवर्तनांत सशब्द सहा मात्रा झाल्यावर दोन निःशब्द मात्रांचा विराम घेतल्याविना नवीन आवर्तनाला आरम्भ होोंधूं शकत नाही. म्हणून या सर्व वृत्तांत (७ ७ --) वा (-७ ७ -) वा (७ • • • -) या पहिल्या गणाच्या अन्तीं द्विमात्रक विराम असल्याने तेथे यति मानणे अपरिहार्य आहे. १ यांच्या व्यतिरिक्त याच प्रकारचीं आणखी काही वृतें आहेत. त्यांची ठाझुकी छन्दःशास्रज्ञांस नाही; पण त्यांचीं क्षुदाहरणें वाडमयांत सापडतात. त्यांचीं क्षुड़पथ, सुरासुरवन्द्य, त्रिदशाङ्गना अशीं नावें शुदाहरणांतील शब्दांवरून मी ठेविलीं आहेत. विस्तारभयास्तव तीं येथे दिलीं नाहीत.