पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वसाधारण महिलांना अशक्य होईल.
 पुरुष आमदार खासदारांचीही परिस्थिती अशीच कठीण होऊन जाईल. पुरुषांकरिता खुल्या असलेल्या कोणत्याही मतदारसंघातून ते निवडून आले तर पुढील निवडणुकीमध्ये तो मतदारसंघ पुरुषांसाठीच खुला असेल याची काही खात्री नाही. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघांचीही निगराणी होण्याची शक्यता नाही. एकूण सर्व मतदारसंघांपैकी दोन तृतीयांश मतदारसंघांत तरी आमदार खासदारांना मतदारसंघाची सेवा करण्यात काहीही स्वारस्य असणार नाही. याशिवाय कायदेमंडळात एक तृतीयांशापेक्षा जास्त अनुभवी लोकप्रतिनिधी न राहिल्यामुळे कायदेमंडळाच्या कामाचीही गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे. त्याखेरीज प्रत्येक निवडणुकीत दोन तृतीयांश मतदारांना- त्यात महिला मतदारांचाही समावेश असेल -ह्र महिला उमेदवाराला मत देण्याची संधीच मिळणार नाही.
 हे सर्व लक्षात घेता शेतकरी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशी सूचना केली आहे की,
 स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यात प्रमाणशीर मतदानपद्धतीचा पुरस्कार करण्यात आला आहे. अशी पद्धत जर अमलात आली तर ना स्त्रियांना, ना दलितांना आणि ना आदिवासींना स्वतंत्र राखीव मतदारसंघ देण्याची गरज राहील.

 जर का प्रमाणशीर मतदानपद्धती स्वीकारणे शक्य नसेल तर मग महिलांना राखीव जागा देण्यासाठी अधिक शास्त्रीय आणि तर्कशुद्ध योजना उभी करावी लागेल. सध्याच्या तीन मतदारसंघांचा मिळून एक मतदारसंघ बनविण्यात यावा आणि त्यामध्ये तीन उमेदवारांपैकी एक जागा महिलांसाठी असेल. मतदार हे कोणत्याही तीन उमेदवारांना मते देऊ शकतील, मात्र, त्यांतील किमान एक उमेदवार महिला असणे आवश्यक असेल अन्यथा ती संपूर्ण मतपत्रिका बाद धरण्यात येईल. सर्वांत जास्त मते मिळालेला उमेदवार- मग तो पुरुष असो की महिला- निवडणुकीत त्या मतदारसंघातील सर्वसाधारण जागेवर निवडून आला/ आली असे धरायचे. उरलेल्या उमेदवारांमधील महिला उमेदवारांमध्ये सर्वांत जास्त मते मिळविणारी महिला उमेदवार महिलांच्या राखीव जागी निवडून आल्याचे धरण्यात यावे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांतील सर्वांत जास्त मते मिळविणारा उमेदवार-ह्रमग तो पुरुष असो की महिला- ह्मत्या मतदारसंघातील तिसऱ्या जागेसाठी निवडून आला/आली असे धरायचे. या पद्धतीमुळे आमदार खासदारांची संख्या वाढणार नाही, खर्चही वाढणार नाही, एवढेच नव्हे तर, निवडणुकीमध्ये मतदारांनासुद्धा त्यांच्या पसंतीनुसार उमेदवारांना कमीअधिक प्राधान्य देण्याची शक्यता निर्माण होईल. त्याशिवाय, सर्व मतदारांना महिला

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३४