________________
(३) संपूर्ण प्रक्रियेत वापरलेला एकूण माल व तयार माल यांचे समीकरण चटकन मांडून माल वाया जात नसल्याची खात्री करून घेता येते. (४) प्रत्येक पायरीला किती वेळ लागतो याचा अंदाज मिळतो व संपूर्ण कृतीचे नियोजन करता येते. (५) संपूर्ण कृतीदरम्यान किती खर्च कशावर झाला हे चटकन समजते. विद्यार्थी कृती (IT) : आपल्या परिसरामध्ये अन्नप्रक्रिया करणाऱ्या एखाद्या उद्योगास भेट द्या. संगणकातील Presentations चा M.S. Powerpoint सारख्या एखाद्या प्रोग्रॅममध्ये प्रकल्पभेटीचे प्रेझेंटेशन तयार करा. उद्योगाच्या माहितीपत्रकातील किंवा उत्पादनाच्या जाहिरातीतील चित्रे, फोटो प्रेझेंटेशनमध्ये वापरा. प्रवाहाकृतीच्या आधारे प्रत्येक पायरीसाठी एक एक स्लाईड अशा प्रकारे संपूर्ण कृतीचे एक सलग प्रेझेंटशन तयार करा. पेरूची जेली साहित्यः सुरी, स्टोव्ह, पातेले, कुकर, चमचा, स्वच्छ पेरू २ किलो बाटली, बरणी इ. फोडी करणे । चाकू माल : पेरू, साखर, लवंग, दालचिनी, लिंबू इ. कृती: लहान फोडी (१) पेरूच्या लहान फोडी करा. प्रेशर स्टोव्ह पाणी शिजवणे. प्रेशर कुकर (२) सर्व फोडी बुडतील एवढे भांड्यात पाणी घ्या. शिजविलेल्या फोडी त्यात फोडी टाका. जाळीदार पिशवी (३) कुकरमध्ये त्या शिजवा, (नरम) गाळणे चोथा१.७५किलो (४) फोडी स्वच्छ जाळीदार कपड्यात बांधून टांगणे, (५) त्या खाली एक पातेले ठेवा. पेरूचा अर्क ७00 ग्रॅम प्रेशर स्टोव्ह व पातेले (६) पाणी पातेल्यात पडेल. साखर १७५ ग्रॅम (७) पाण्याचा १/४ भाग साखर घ्या. मिश्रण करणे (८) ६-७ लिंबाचा रस घ्या. गोड अर्क (९) आता पाणी + साखर + लिंबू एकत्र करा - द्रावण. (१०) हे द्रावण स्टोव्हवर आटवा. | लिंबूरस,दालचिनी, (११) आता घट्ट द्रावणात १२ लवंगा व दालचिनीचे उकळणे तुकडे काढा व एक लिंबू रस टाका. पातळ जेली (१२) परत हे द्रावण थोडेसे गरम करा. बाटली (१३) द्रावण घट्ट झाल्यावर (मधासारखे) काढून घ्या. थंड करणे (१४) आता ते बरणीत ठेवा. तयार पेरूजेली ४०० ग्रॅम चांगल्या जेलीची लक्षणे : रबरासारखी मऊ- हाताला चिटकत नाही. चमच्याने काढल्यास - नीट कापून येते. आकार जेलीमध्ये रहातो. पेरूचा व मसाल्याचा स्वाद - पारदर्शक लालसर रंग नोटस् : (१) सर्व हत्यारे स्वच्छ असावीत. (२) पेरू हे मध्यम पिकलेले प्रतीचे असावेत. (कचे नसावेत.) (३) घेतलेल्या मालाचे वजन करा. (४) उष्णता देताना एकदम हळूहळू द्यावी (मंद आच ठेवावी.) ४२ लवंग →पाणी