पान:गृह आरोग्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृती : कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या. त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात. तासानंतर त्या फोडी एका तसराळ्यात घ्याव्यात. सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. फोडींमध्ये लोणच्याचा मसाला, २ चमचे मीठ घालून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. दोन दिवसांनंतर खायला घ्यावे. महिनाभर हे लोणचे फ्रिजमध्ये ठेवावे. (v) उद्देश : मिरचीचे लोणचे: साहित्य : १ किलो लांबट हिरवी मिरची, २ वाट्या मोहरीची डाळ, अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड, दीड चमचा हळद, २ चमचे हिंग, २ ।। ते ३ वाट्या मीठ, १२ लिंबे (रस), १ वाटी तेल. कृती : एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान परातीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झायने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक करून घेतली तरी चालेल. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बारा लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा. लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते. दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : जेली तयार करणे, प्रस्तावना : भारतामध्ये आपण अनेक फळे पाहतो. परंतु सर्वच भागात सर्व फळे उपलब्ध होत नाहीत. तसेच फळे टिकवून ठेवणे जास्त अडचणीचे होते. तसेच ठराविक ऋतुमध्ये ठराविक फळे उपलब्ध असतात. तसेच ही फळे वर्षभर उपलब्ध होत नाहीत. तसेच ही फळे खाण्याचा आनंद मिळविण्यासाठी जेली ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेमुळे वर्षभर फळे खाण्याचा आनंद मिळू लागला. म्हणजेच ज्या काळात जास्त फळे येतील त्या काळात अशा फळांपासून जेली तयार करून ती आपल्याला जास्त दिवस साठवून ठेवता येतो. तसेच जेली छोट्या छोट्या दुकानामध्येही मिळत असते. पूर्व तयारी : (१) जेलीसाठी लागणारे सर्व साहित्य (चाकू, प्रेशर कुकर, कलथा, गॅस, सुती कापड, पातेले) एका ठिकाणी काढून ठेवा. (२) जेलीसाठी लागणारी फळे हे अगोदर खरेदी करून ठेवा. शिक्षक कृती: (१) पेरू जेलीबद्दल माहिती द्या. (२) विद्यार्थ्यांचे गट करणे (३) २ गट असतील तर आणलेले साहित्य विभागून देणे. (४) जेली तयार करण्यासाठी आवश्यक फळांची निवड कशी करावी हे विद्यार्थ्यांना सांगणे.