पान:गृह आरोग्य.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) (४) तुम्ही विद्यार्थ्यांना एक उदाहरण सोडवून दाखवा. (५) विद्यार्थ्यांना एक उदाहरण द्या व सोडवून घ्या. विद्यार्थ्यांना ते रोज कोणता आहार घेतात त्यानुसार शरीरात किती कॅलरीज मिळतात हे काढण्यास सांगा. (७) कोणत्या पोषणद्रव्यामुळे आपल्या शरीराला कोणता फायदा होतो व ती कशातून आपल्याला मिळतात हे सांगा व विद्यार्थ्यांना लिहून द्या. (८) कोणत्या व्यक्तीला किती कॅलरीज गरजेच्या आहेत हे सांगा. विभिन्न अन्नगट व त्यांची कार्ये : क्र. अन्नगट अन्नपदार्थ कार्ये १. धान्य गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी मुख्यत्वे करून ऊर्जा पुरविणे,प्रथिने,मेद,लोह,थायमीन रायबोक्लेविन पुरविणे, तंतुमय पदार्थ पुरविणे. | २. डाळी |घेवडा, वाटाणा,राजमा, मुख्यत्वेकरून प्रथिने पुरविणे, फॉलिक अॅसिड, तंतुमय व कडधान्ये हरभरा, दाणे इ. पदार्थ पुरविणे, थोड्याफार प्रमाणात ऊर्जा पुरविणे, ब, व ब जीवनसत्वे पुरविणे, Ca,Fe पुरविणे. ३. दूध व दूध, दही, लोणी, प्रथिने, मेद, Caआणि जीवनसत्त्वे पुरविणे. | दुधाचे पदार्थ तूप, चीज, पनीर इ. ४. फळे व भाज्या पपई,आंबा,गाजर,टोमॅटो,भोपळा, जीवनसत्वे, क्षार, तंतुमय पदार्थ व Fe पुरविणे. वांगी, हिरव्या पालेभाज्या इ. ५. कठीण बदाम, दाणे, नारळ, काजू इ. मेद, जीवनसत्त्वे आणि Caपुरविणे कवचाची फळे ६. मांस, अंडी मांस, मासे, अंडी प्रथिने, मेद आणि जीवनसत्त्वे पुरविणे. ७. तेल वनस्पती तेल, तेलबिया, तूप इ. ऊर्जा आणि मेदाम्ले पुरविणे. पोषणद्रव्यांच्या अतिसेवनामुळे होणारे तोटे : अन्नातील पोषणद्रव्यांचे अतिसेवन करणे म्हणजे सरळ सरळ अन्नाचा अपव्यय करणे होय. जास्तीचे अन्न खाण्यामळे ते खाणाऱ्याला कोणताही फायदा होत नाही. परंतु त्यामुळे त्याला रोग किंवा विकृती होतात. याचा अर्थ असा की आरोग्य सामान्य स्थितीत ठेवण्याऐवजी ते बिघडते. समतोल आहाराची निवड : उद्देश : दिलेल्या मिश्रणातून मूगडाळ व तांदूळ ओळखणे, ६० किलो वजनाच्या व्यक्तीला २४०० कॅलरीज व वजनानुसार योग्य प्रमाणात प्रथिने मिळवण्यासाठी डाळ-तांदुळाच्या खिचडीसाठी मूगडाळ, तांदूळ व तेल योग्य प्रमाणात वजन करून घेणे. अपेक्षित कौशल्येः मूगडाळ व तांदूळ ओळखता येणे, निवडता येणे, आवश्यक कॅलरीज व प्रथिने मिळविण्यासाठी मूगडाळ व तांदुळाचे वजन ठरविता येणे, वजनकाटा वापरून योग्य वजनाची मूगडाळ व तांदूळ मोजून घेता येणे. साहित्य : तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मटकी, मूग-प्रत्येकी १५० ग्रॅम घेऊन त्यांचे तयार कोरडे मिश्रण, वजनकाटा, आवश्यक डाळ व तांदूळ ठेवण्यासाठी मोठ्या वाट्या किंवा भांडी, तेल. कृती: (१) ६० किलो वजनाच्या व्यक्तीला ६० ग्रॅम प्रथिने मिळाली पाहिजेत. ६० ग्रॅम प्रथिनांसाठी ८० ग्रॅम डाळ घेणे आवश्यक आहे. ८० ग्रॅम डाळीमधून १६०० कॅलरीज मिळतील. (२) एकूण २४०० कॅलरीजपैकी १६०० कॅलरीज प्रथिनांमधून मिळाल्यानंतर उरलेल्या ८०० कॅलरीज स्निग्ध व पिष्टमय पदार्थांतून मिळायला हव्यात. (२४००-१६०० = ८००) (३) खिचडीच्या फोडणीसाठी कमीतकमी २५ ग्रॅम तेल आवश्यक आहे; एवढ्या तेलातून २२५ कॅलरीज मिळती (८००-२२५ = ५७५) २८