________________
आवश्यक घटक : जॅम मार्मालेडसाठी व जेली मार्मालेडसाठी अनुक्रमे जॅम व जेलीचेच घटक आवश्यक आहेत. याशिवाय आंबटसर फळांची साले मार्मालेडसाठी लागतात. तत्त्व : जॅम वजेलीचीच तत्त्वे यात वापरली जातात. पद्धत : जॅम मार्मालेडसाठी जॅमची पद्धती व जेली मार्मालेडसाठी जेलीची वापरतात. फक्त हे शिजत आल्यावर त्यात फळाची साले घालतात. फळाची साले तयार करणे - यासाठी मुख्यतः संत्रे वा लिंबाची साल वापरतात. या सालीच्या आतील पांढऱ्या रंगाचा भाग शक्य तितका सुरीने खरवडतात. नंतर याचे २-३ सेंटीमीटर लांबीचे व अर्धा सेंमी रुंदीचे तुकडे करतात. हे तुकडे उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे उकळून पाणी टाकून देतात. परत उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे उकळतात. त्यामुळे सालातील कडवटपणा कमी होतो. ही साले जॅम व जेली शिजताना त्यात घालतात. ड) जॅम, जेली व मार्मालेडमधील फरक : जॅम जेली व मार्मालेड हे तीनही पदार्थ साखर घालून संरक्षित केलेले असले तरी त्यात काही मूलभूत फरक आहेत. ते खालीलप्रमाणे. फळाचा प्रकार : जॅमसाठी गरयुक्त कोणतेही फळ वापरले तरी चालते. जेलीसाठी भरपूर प्रमाणात पेक्टिन असलेले फळ वापरावे लागते किंवा कृत्रिम पेक्टिन पावडर त्यात घालावी लागते. मार्मालेड हे जॅम मार्मालेड वा जेली मार्मालेड असेल तर त्यानुसार त्याला फळे घ्यावी लागतात. २. स्पर्शजाणीवत्व : जॅम हा घन अपारदर्शक व सपाट पृष्ठभागावर सहज पसरता येतो. तर जेली ही पारदर्शक सेट झालेली असते व सुरीने कापता येते. ३. जॅममध्ये फळांचा गर वापरतात तर जेलीमध्ये पेक्टिन अर्क वापरतात. मार्मालेड हे जॅम व जेली मार्मालेड असेल त्यानुसार गर/अर्क वापरतात.पण मार्मालेडचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात संत्र्याची साल घातलेली असते. दिवस: पाचवा प्रात्यक्षिक : रक्तगट तपासणे. प्रस्तावना : रक्त ही अशी गोष्ट आहे की ती कृत्रिमपणे तयार करता येत नाही. सर्व व्यक्तींच्या रक्ताचा रंग लाल असला तरी सर्व रक्तगट एकच नसतात. आपला रक्तगट माहिती असणे ही अतिशय गरजेची गोष्ट बनली आहे. पूर्वी आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी आपला फोटो, आपले नाव या गोष्टींची गरज होती. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की आता आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या आयकार्डवर आपला रक्तगट लिहिणे सुद्धा गरजेचे झाले आहे. तसेच रक्तगट हा कधीही न बदलणारा असतो. तो आयुष्यभर एकच राहतो. तसेच आपणांस रक्तगट माहिती असल्यामुळे आपल्याला त्याचा बराच फायदा होतो. रक्त देणे-घेणे सोपे होते. पूर्व तयारी : (१) लँसेट भरपूर आणून ठेवा. (२) टेबल खुर्ची आणून ठेवा. (३) रक्तगट तपासण्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवा.(रक्तगट कीट, लँसेट, काचपट्टी, स्पिरीट, कापूस) उपक्रमाची माहितीः (१) शाळेतील सर्व मुलांचे रक्तगट तपासून त्याचा अहवाल मुख्याध्यापकांना द्या. (२) गावातील पॅथालॉजी लॅब किंवा सरकारी दवाख्यान्याला भेट द्या. (३) सरकारी डॉक्टरांच्या मदतीने गावात रक्तगट तपासणी कँप घ्या. अपेक्षित कौशल्ये : (१) मुलांना प्रिक करता येणे. (२) रक्तगट ओळखता येणे. विशेष माहिती : रक्त म्हणजे : रक्त हा जैविक द्रव पदार्थ आहे. लाल रक्त पेशी (आर.बी.सी. किंवा एरथ्रोसाईटस्) पांढऱ्या रक्तपेशी (ल्युकोसाईटस्) आणि बिंबीका (प्लेटलेटस् किंवा थ्रीबोसाईटस्) यांनी १७