पान:गृह आरोग्य.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७) बाटलीवर लेबल लावावे : यात पदार्थाचे नाव-घटक पदार्थ तयार करण्याची तारीख, वजन, किंमत, पदार्थ साठविण्याविषयी सूचना यांचा समावेश असावा. (ब) जेली तयार करणे : फळातील पेक्टिनच्या अर्कात योग्य प्रमाणात साखर व आम्ल घालून ते पारदर्शक होईपर्यंत शिजवून गार करून जेली तयार करतात. आदर्श जेली पारदर्शक परंतु मऊ असते. ती सहज कापता येते व तिला ज्या फळापासून केली आहे त्याचा स्वाद व रंग असतो. ही जेली साच्यातून काढली तरी साच्याच्याच आकारात राहते. ती मोडत नाही. जेलीसाठी आवश्यक घटक: (१) पेक्टिन ः साधारणपणे चांगल्या जेलीसाठी ०.५ ते १% पेक्टिन आवश्यक आहे. (२) आम्ल : आम्लामुळे जेली कडक न होता, आहे त्या आकारात, पण मऊ राहते. एक किलो फळांचा गर असल्यास १.५ ते २ ग्रॅम सायट्रिक आम्ल घालतात. (३) साखर : पेक्टिनच्या प्रमाणानुसार साखर घालतात. त्यामुळे गोड चव येते. तत्त्व :(१) साखरेचा अन्नसंरक्षक म्हणून वापर (२) उच्च तापमानाचा वापर. जेली करण्याची पद्धती: (१) फळांची निवड : ताजी, निरोगी, घट्ट, पेक्टिनयुक्त उत्तम रंग व स्वाद असलेली फळे निवडावी. (२) पेक्टिन अर्क तयार करणे : • फळे धुणे : फळावरील माती, जंतुनाशके काढण्यासाठी फळे स्वच्छ धुवावी. • निर्जंतुकीकरण : साधने व उपकरणे वापरून उकळत्या पाण्याने निर्जंतुक करावी. • फळांचे तुकडे करणे व पेक्टिन अर्क तयार करणे : फळांचे मध्यम आकाराचे एकसारखे तुकडे करावे. फळांचे तुकडे बुडतील इतके पाणी घालून ते गरम करावे. द्रावण दुधाळ झाल्यावर पातळ फडक्यातून गाळून घ्यावे. फडक्यात फळांचे तुकडे राहतील व भांड्यात पेक्टिन अर्क राहील. वरील फळांच्या तुकड्यात परत पाणी घालून उकळी द्यावी. द्रावण दुधाळ झाल्यावर परत गाळावे व पेक्टिन अर्क काढावा. हा अर्क काही तास तसाच ठेवा. वरील पाणी ओतून घ्यावे. या पाण्यातील पेक्टिनचे प्रमाण ठरविण्यास खालील चाचणी करावी. पेक्टिन चाचणी : वाटीत १ टी स्पून पेक्टिन अर्क घेऊन त्यात २ टी स्पून स्पिरीट घालावे. हे मिश्रण ढवळावे व काही मिनिटे ठेवावे. एक घट्ट गोळी तयार झाल्यास उत्तम प्रमाणात पेक्टिन आहे. काही मऊ गोळ्या तयार झाल्यास मध्यम प्रमाणात पेक्टिन आहे व दाट द्रावण तयार झाल्यास पेक्टिन अगदीच कमी प्रमाणात आहे असे समजावे. (टीप : वरील टेस्ट झाल्यावर वाटीतील अर्क व स्पिरीटचे मिश्रण टाकून द्यावे) (३) साखर घालून शिजविणे : उत्तम प्रमाणात पेक्टिन असल्यास अर्काच्या पाऊणपट साखर घालावी व मध्यम प्रमाणात पेक्टिन असल्यास अर्काच्या निम्मी साखर घालावी, आम्ल घालावे व मंद आचेवर शिजवावे. (४) जेली झाल्याची कसोटी पाहणे : काटा उभा धरून मिश्रणात बुडवावा. काट्याच्या मधील जागांमध्ये जेली न पडता तशीच राहिल्यास जेली तयार झाली असे समजावे. (५) जेली भरणे : वरील तयार जेली कोरड्या निर्जंतुक बाटलीत भरावी. (टीप : बाटली तडकू नये म्हणून बाटलीखाली जाड कापडी घडी ठेवावी वा बाटली लाकडी फळीवर ठेवावी.)जेली भरताना अशा त-हेने सुरी धरावी की सुरीच्या टोकावरून जेली बाटलीत जाईल म्हणजे हवेचे बुडबुडे आत राहणार नाहीत. गार झाल्यावर बाटलीचे झाकण लावा. थंड कोरड्या जागी ठेवा,जॅमप्रमाणे लेबल लावा (६) मार्मालेड: मार्मालेडचे दोन प्रकार आहेत. (१) जॅम मार्मालेड व (२) जेली मार्मालेड, याचे वैशिष्ट्य म्हणजे जॅम व जेलीत आंबटसर फळांची साले घातलेली असतात. १६