पान:गृह आरोग्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकिया व उपकरणाचे नाव अ) फळे धुणे : चाळणी, टोपली,बादली ब) निर्जंतुकीकरण: वर्णन व उपयोग काही फळांना धूळ, माती किंवा चीक चिकटलेला असतो. अशी फळे पाणी भरलेल्या बादलीत काही काळ बुडवून ठेवतात. फळे निथळविण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या चाळण्या किंवा प्लॅस्टिकच्या जाळीदार टोपल्या वापरतात. जॅम, जेली वा मार्मालेड करताना सर्व उपकरणे व साधने निर्जतुक करण्यासाठी उकळते पाणी वापरतात. निर्जंतुकीकरणासाठी खालील साहित्य लागते. काचेच्या बरण्या वा बाटल्यांमध्ये जॅम, जेली वा मार्मालेड भरायचे असल्यास या बाटल्या निर्जंतुक करण्यासाठी अॅल्युमिनियमच्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात उकळतात. गरम बाटल्या उचलण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सांडश्या वापरतात. आवश्यक क्षमतेच्या रुंद तोंडाच्या काचेच्या बरण्या यासाठी वापरतात. १. पातेली २. सांडशी (पक्कड) ३. बरण्या व बाटल्या क) इतर साधने: १. स्टेनलेस स्टील किंवा ग्रॅनाइटचे टेबल २. वजन काटा ३. लाकडी फळी ४. सुरी ५. सोलाणे या टेबलावर प्रत्यक्ष पदार्थ तयार करतात. यावर आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही. फळांचे वजन करण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचा वजनकाटा व वजने असणे गरजेचे आहे. फळे चिरणे, सोलणे या प्रक्रियांसाठी स्वच्छ गुळगुळीत लाकडी फळीचा वापर करतात. फळे चिरण्यासाठी स्टेनलेस स्टीलची धारदार सुरी वापरतात. फळांची साल काढण्यासाठी लाकडी अथवा स्टेनलेस स्टीलची मूठ व स्टेनलेस स्टीलचे पाते असलेले धारदार सोलणे वापरतात. त्यामुळे फळातील गर न काढता साल वरच्या वर काढली जाते. या साधनाचा मधला गोल भाग फळात घुसवून त्यातील गाभा व बी बाहेर काढतात. या साधनाचा उपयोग मुख्यत्वे अननसाचे काटे डोळ्यांसह विलग करण्यासाठी होतो. विशेषतः जॅमसाठी फळांचा गर करताना याचा उपयोग करतात. यासाठी फळांचे तुकडे शिजवून यंत्रात टाकतात. यात फळातील अखाद्य भाग वेगळा होतो व एकजीव गर तयार होतो. गर काढण्याच्या यंत्रात एक स्टेनलेस स्टीलचा जाळीदार पोकळ लंब वर्तुळाकार रोलर असतो. त्याच्या आतील बाजूस वल्याप्रमाणे दांडे असून, दांड्यांच्या दोन्ही बाजूस ब्रश असतात. हे ब्रश विजेच्या साहाय्याने हलतात. हलत्या ब्रशमुळे यंत्रातील फळे चिरडली ६. गाभा काढण्याचे साधन ७. डोळा काढण्याचे साधन ८. गर काढण्याचे यंत्र