Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा कर्माने बांधलेला आहे (महा. शांति. २४०.७) असे जे महाभारतात म्हटले आहे, त्याचा अर्थ हाच आहे. मनुष्यास आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास स्वातंत्र्य नाही, असे हेकेल सारख्या आधिभौतिक पंडिताने म्हटले आहे. त्याची स्थिती ही डोंगरावरुन खाली गडगडत येणाऱ्या धोंड्यासारखी असते, असे त्याचे मत आहे. मग माणसाची यातून सुटका कशी होणार? याला काही उपाय आहे कि नाही? किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास माणसाला 'आत्मस्वातंत्र्य' आहे की नाही ? हा प्रश्न आहे. पण नीट विचार केला तर चांगली वाईट कर्मे करण्याचे स्वातंत्र्य माणसाला असते, असे दिसून येईल. आपल्या जवळचे द्रव्य हे व्यसनात घालवायचे की परोपकारार्थ त्याचा विनियोग करावयाचा हे तो ठरवू शकतो. सदसद्विवेकाच्या योगे शुभ कर्मे करून आपल्या प्रारब्धात बदल घडवणे अगर आपली आध्यात्मिक उन्नती करणे हे त्याला शक्य आहे. तो सर्वस्वी परतंत्र नाही. म्हणूनच गीतेत म्हटले आहे - 'उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत । - आत्मैव ह्यात्मनो वन्धुरात्मैव रिपुरात्मनाः ।। " (गीता ६–५ ) अर्थ - प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्यावा, आपली अवनती होऊ देऊ नये. आत्मा हाच आपला बंधु आहे व आत्मा हाच आपला शत्रू आहे. आणि दुसरे असे की मनुष्य जर सर्वस्वी परतंत्र असेल तर मोक्षाचा उपदेश करणारी उपनिषदे, महाभारत, गीता, भागवत इत्यादी शास्त्रे निर्माण झालीच नसती. सारांश, मानवास आत्मस्वातंत्र्य आहे व त्यायोगें तो आपली उन्नती घडवून आणू शकतो. हे कसे शक्य आहे, हे आता पाहिले पाहिजे. मनुष्याचे शरीर व त्यात रहाणारा आत्मा या दोन गोष्टी भिन्न आहेत. त्यापैकी आत्मा नित्य, शुध्द व स्वतंत्र आहे. तो परमात्म्याचा अंश आहे. फक्त शरीराच्या आवरणात अडकल्याने त्याला स्वातंत्र्य लाभत नाही. हे समजण्यासाठी कर्माचा नीट परिचय करुन घेतला पाहिजे. कर्माचे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण असे तीन प्रकार आहेत. संचित म्हणजे आजवर केलेल्या कर्माचा साठा. या कर्मापैकी भोगण्यास प्रारंभ झालेल्या गीता रहस्य : एक अध्ययन