Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परमात्मा हे दोन्ही एकच आहेत. हा अध्यात्म शास्त्राचा महत्वाचा सिध्दांत आहे, यासच ‘पिंडी ते ब्रहमांडी' असे म्हणण्याचा प्रघात आहे, याचा अर्थ माणसाच्या शरीरातील एकादश इंद्रिये, अहंकार, बुध्दी हे सारे नामरुपात्मक अत एव मिथ्या आहेत शरीरात रहाणारा आत्मा मात्र सत्य व नित्य आहे. 'आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे' असे उपनिषदात म्हटले आहे. याचा अर्थ काय आहे हे पाहिले पाहिजे, अंश म्हणजे अवयव अथवा तुकडा होय. आत्मा हा परमात्म्याचा अंश असेल तर परमात्मा सावयव आहे असे म्हणावे लागेल व तो नित्य ठरेल यास्तव 'अंश' या शब्दाचा अर्थ वेदान्तात निराळाच आहे. एकाच सूर्याचे तळ्यात ,नदीत,विहिरीत प्रतिबिंब पडलेले आढळून येते त्याप्रमाणे प्रतिशरीरातील आत्मा हा परमात्म्याचे प्रतिबिंब आहे, असे मानलेले आहे, किंवा दुसरे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास एकच आकाश घटात, मठात लहान मोठ्या प्रमाणात सामावलेले आहे. अशाप्रकारे वेदांतमताचे अथवा अध्यात्मशास्त्राचे हे मूलभूत सिध्दांत आहेत. गीता,उपनिषदे यांचे सूक्ष्म अध्ययन करणान्यास त्यांचे ज्ञान होते पण हे सिध्दांत समजले म्हणजे खरे ज्ञान झाले असे नाही. हे सिध्दांत मनात मुरणे आवश्यक आहे. त्यासाठी वैराग्य, ध्यानधारणा, उपासना इत्यादिकांची नितांत आवश्यकता असते यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा अध्यात्म शास्त्राचा अखेरचा सिध्दांत आहे. 'कठोपनिषदात' हा आत्मा प्रवचनाने, बुद्धिमत्तेने अथवा बहुश्रुत झाल्याने प्राप्त होत नाही. '(कठ २.२२) असे म्हटले आहे. आणि मोक्ष म्हणजे तरी काय ? ती आत्म्याचीच शुध्द अवस्था आहे. ज्यांला पूर्ण आत्मज्ञान झाले त्यांना मोक्ष बसल्याजागी प्राप्त होतो. यालाच 'ब्राहमीस्थिती' असे नाव आहे. ही स्थिती जशी अध्यात्म ज्ञानाने प्राप्त होते, तशी स्थिर अशा भक्तीनेही प्राप्त होते. तथापि या तत्वज्ञानाचे मूळ उपनिषदांच्याही अगोदर असलेल्या वेदात सापडते. ऋग्वेदातील 'नासदीय सुक्त' (ऋग्वेद. १०.१२९) हे या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. टिळकांनी त्याचे मूळ मंत्र व भाषांतर दिले आहे. या सूक्तात फक्त सातच मंत्र आहेत. गीता रहस्य : एक अध्ययन ७२