जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. तुकाराम बोवांनी यास 'मरणाचे मरण' असे म्हटले आहे. हीच 'जीवन्मुक्तावस्था' होय. आता या स्थितीत योग्याला काही सिध्दी प्राप्त होतात. त्यास काही चमत्कार घडवून आणता येतात पण साधकाने या सिध्दीच्या नादाला न लागता परमात्म स्थिती कशी प्राप्त होईल. हे पाहिले पाहिजे सिध्दीचा ब्रह्मविद्येशी काही संबंध नाही. 'परमात्मा मायेने ही सारी सृष्टी निर्माण करतो. असे म्हणताना द्वैताचा आश्रय केलेला दिसून येतो. उपनिषदातील अशा द्वैतपर वचनांच्या आधारे विशिष्टाद्वैत, द्वैत इत्यादी संप्रदाय निर्माण झाले आहेत. निरनिराळ्या उपनिषदात मतभिन्नता आढळते, पण गीतेची स्थिती तशी नाही. गीतेत सर्वत्र अद्वैताचेच प्रतिपादन केलेले आहे. निर्गुण ब्रह्मावर ईश्वरी मायेच्या योगे जो नामरुपात्मक देखावा दिसतो तो मिथ्या असतो. या मतास 'विवर्तवाद ' असे म्हणतात. शांकरमतात नेहमी दोरीवर सापाचा किंवा शिंपलीवर रुप्याचा भास होण्याची उदाहरणे देण्यात येतात या उलट उपनिषदात मृत्तिका व घट, बीज आणि अंकूर अथवा सोने आणि अलंकार यांची उदाहरणे दिली आहेत. यास परिणामवाद म्हणतात. दुधाचे दही होणे, हे परिणाम वादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सदानंदाच्या 'वेदांतसार' या ग्रंथात परिणाम व विवर्त याची लक्षणे पुढील श्लोकात दिली आहेत. "1 ' अस्तात्विकोऽन्यथाभावः परिणाम उदीरितः । अतात्विकोऽन्यथाभावः विवर्तः स उदीरितः ॥ ( वेदान्तसार -- २१ ) याचा अर्थ एखाद्या मूळ वस्तू पासून खरी वस्तू उत्पन्न होते त्यास परिणाम म्हणतात व जेव्हा मूळ वस्तू (मायेमुळे) निराळीच भासू लागते विवर्त असे नाव आहे. अद्वैतवाद्यांनी विवर्तवादाचा जरी स्वीकार केला असला तरी नामरुपात्मक सृष्टीपासून जेव्हा इतर पदार्थ निर्माण होतात, तेव्हा त्याची उपपत्ती परिणामवादाने लावली आहे. या मायात्मक देखाव्याचा विस्तार हा नियमबध्द आहे, एवढेच त्यानां सांगायचे असते. हा सारा ब्रह्मांडाचा विचार झाला. मानवाच्या शरीरात रहाणारा जीवात्मा व गीता रहस्य : एक अध्ययन ७१
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/९०
Appearance