गीतेत परमात्म्याचे वर्णन करताना व्यक्त आणि अव्यक्त असे शब्द योजलेले आहेत. व्यक्त म्हणजे इंद्रियास गोचर होणारे व अव्यक्त म्हणजे इंद्रियास गोचर न होणारे. आता व्यक्त म्हणजे सगुण असे म्हणता येते पण अव्यक्त म्हणजे निर्गुण असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म गुण त्यात असू शकतात यास्तव अव्यक्ताचे सगुण, सगुण-निर्गुण व निर्गुण असे तीन प्रकार होतात. पण ब्रह्म तत्व सगुण आहे की निर्गुण आहे की सगुण निर्गुण आहे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ज्ञानदेव म्हणतात - ^^ 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे । सगुण – निर्गुण एक गोविंदु रे || " - (हरिपाठ) गीतेत भगवान कृष्ण सगुण म्हणजे व्यक्तिरुपात अर्जुनास उपदेश करीत आहेत. सातव्या अध्यायात ते म्हणतात- “ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुध्दयः । परं भावम जानन्तो ममाव्यय मनुत्तमम् ॥ (गीता ७.२४) अर्थ – अबुध्दी म्हणजे मूढ लोक माझे श्रेष्ठ, उत्तम व अव्यक्त असे रुप न - जाणता व्यक्त रुपात जाणतात. - कृष्णाने आपला प्रथम पुरुषी निर्देश केला आहे. त्यामुळे परब्रह्म हे सगुण व साकार आहे, अशी समजूत होण्याची शक्यता असल्याने मुद्दाम खुलासा केला आहे. परब्रह्म परमात्मा हा निर्गुण आहे पण त्यापासून उद्भवलेली सृष्टी मात्र सगुण आहे. हा विचार सत्कार्यवादाशी जुळणारा नाही. पण ही सृष्टी नामरुपात्मक आहे. सत्य नसून मिथ्या आहे. हे लक्षात घेतले म्हणजे निर्गुणापासून सगुण कसे उत्पन्न झाले, हा प्रश्न शिल्लक रहात नाही. इतकेच नव्हे भगवंतांनी अकराव्या अध्यायात अर्जुनाला जे विश्वरुप दाखवले, ते हि मायिकच होते. अव्यक्ताचे व्यक्त होणे यास माया असे नाव आहे, आता हे अव्यक्त सगुण आहे की निगुर्ण आहे. हे पहावे लागते. सांख्यांची प्रकृती अव्यक्त असूनही त्रिगुणात्मक आहे. पण परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे, हे समजत नाही. गीता रहस्य : एक अध्ययन ... ६६
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/८५
Appearance