Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेत बुध्दीला 'व्यवसायात्मिका ' असे विशेषण दिलेले आहे. (गीता २.४४) संकल्प, वासना, श्रध्दा, प्रेम, दया, आनंद, भीती, मत्सर, क्रोध इत्यादी गुण अथवा धर्म हे मनाचेच आहेत. त्यामुळे बुध्दी मनाच्या मदतीशिवाय कोणत्याही इंद्रियास प्रेरणा देऊ शकत नाही. जेव्हा ओळखीच्या माणसाला आपण हाक मारतो तेव्हा अनेक प्रक्रिया घडतात. डोळे मनास माहिती देतात. ती बुध्दी मार्फत आत्म्यापर्यंत जाते. येथे हा मनुष्य आपला स्नेही आहे, याचे ज्ञान होते हाक मारण्याची प्रेरणा बुध्दी कडून मनास व तेथून इंद्रियास मिळते. बुध्दी शब्दाचा व्यवहारात वासना असा अर्थ होतो उदाः अमक्याची बुध्दी खोटी आही तेव्हा सारासार विवेक करणाऱ्या बुध्दीला व्यवसायात्मिका आणि वासनेला नुसता बुध्दी हा शब्द योजलेला आढळतो. आता माणसाची बुध्दी शुध्द असल्याशिवाय ती योग्य निर्णय घेणार नाही. गुन्हे करणाऱ्या माणसाची बुध्दी एक तर भ्रष्ट होते किंवा तो बुध्दीला न जुमानता गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. यासाठी बुध्दी ही शुध्द व स्थिर केली पाहिजे. कांटने व्यवसायात्मक बुध्दीला 'प्युअर रीझन 'व वासनात्मक बुध्दीस 'प्रॅक्टिकल रीझन 'अशी नावे दिली असून त्यांचे विवेचन दोन स्वतंत्र ग्रंथात केले आहे. आता बुध्दी स्थिर व शुध्द करण्यासाठी गीतेने पातंजल योगाचा आश्रय करण्यास सांगितले आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायात याचे वर्णन केले आहे. योगाभ्यास हे बुध्दी शुध्द करण्याचे साधन आहे. हे ध्यानात ठेवले पाहिजे. अशा प्रकारे सारासार विवेकाबाबत निर्णय घ्यावे लागतात. या बुध्दीचेही सात्विक, राजस व तामस असे प्रकार होतात एकाच गोष्टी बाबत अनेक जण वेगळे निर्णय का घेतात याची उपपत्ती या प्रकारांनी चांगली लागते. सारांश बुध्दी हा शरीराचाच धर्म आह `त्यामुळे ती देवता नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आता बुध्दीचे सात्विकादि प्रकार होतात असे नुसते म्हणून चालणार नाही. तर प्रत्येकाने आपली बुध्दी सात्विक कशी होईल हे पाहिले पहिजे. गीतेत सात्विक बुध्दीचे लक्षण पुढीलप्रमणे दिले बआहे. 4 "प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी ।। (गीता. १८.३० ) गीता रहस्य : एक अध्ययन