होत नाही. 'आहे-नाही' या दोन्ही च्याही स्वरुपाचा ज्ञानीपुरुषानी निर्णय केला आहे. वरील मत सांख्याच्या सत्कार्यवादासारखे दिसत असले तरी त्याच्यापेक्षा व्यापक आहे. त्याचे आधुनिक मताशी अधिक साम्य आहे. सत्कार्यवाद हा वेदांत्यास मान्य असला तरी या सिध्दांताची व्याप्ती सगुण सृष्टीच्या पलीकडे जात नाही. निर्गुण ब्रह्मापासून सगुण सृष्टी कशी उत्पन्न झाली, याचे उत्तर सत्कार्यवादाने मिळत नाही. सांख्यांनी सृष्टीची विभागणी जड आणि चेतन या दोन प्रकारात केली आहे. पहिल्यात डोंगर, नद्या, जमीन, झाडेझुडुपे या अचेतन गोष्टी येतात तर दुसऱ्यात जीवसृष्टीचा समावेश होतो. पहिल्यास 'प्रकृति' व दुसऱ्यास 'पुरुष' अशी नावे दिली आहेत. त्यांच्या मते हीच दोन मूलतत्वे आहेत. सृष्टीचे मूलकारण असणारी प्रकृति ही सत्व, रज, तम या तीन गुणानी बनली आहे. म्हणून तिला त्रिगुणात्मक म्हणतात. ती अचेतन पण क्रियाशील आहे. या उलट पुरुष हा अचेतन पण निष्क्रिय वा उदासीन (natural) आहे. तीन गुण जो पर्यंत साम्यावस्थेत असतात तोपर्यंत सृष्टिनिर्मिती होत नाही. ते कमी जास्त होऊ लागले की सृष्टिनिर्मितीला प्रारंभ होतो. ही साम्यावस्था कशामुळे ढळते, याचे त्यांच्या जवळ उत्तर नाही. सृष्टीतील प्रत्येक पदार्थात हे तीनही गुण कमी जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळेच सृष्टीत सोने, रुपे, लोखंड, माती, पाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आढळून येतात. सत्व हा गुण ज्ञानरुपी आहे. रज हा उलाढाली करणारा आहे तर तमोगुण हा निद्रा, आळस, यानी युक्त आहे. त्रिगुणात्मक प्रकृती ही अव्यक्त, स्वयंभू, एकजिनसी असून ती चोहीकडे भरून राहिली आहे. प्रकृतीला जाणणारा पुरुष हा तिच्याहून भिन्न आहे. यालाच 'ज्ञ' म्हणजे ज्ञाता असे म्हटले आहे मात्र सांख्यांनी पुरुष हे असंख्य मानले आहेत. प्रकृती आणि पुरुषांचा संयोग झाला म्हणजे सृष्टीला प्रारंभ होतो, असे सांख्यांनी सांगितले आहे. प्रकृतीच्या मोहाने पुरुष संसार चक्रात सापडतो. आपण व प्रकृती हे भिन्न आहोत याचा त्याला विसर पडतो. जेव्हा त्याला आपल्या वेगळेपणाचे गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६९
Appearance