व्यतिरिक्त तीन,अग्नीत रसा व्यतिरिक्त दोन व वायुच्या परमाणूत स्पर्श हा एकच गुण आहे. अर्वाचीन काळातील डाल्टन या शास्त्रज्ञाने मांडलेल्या 'अणु सिधदांताशी याचे साम्य आहे. पण हा सिध्दांत मागे पडला. त्यामुळे त्याचा विचार करण्याचे कारण नाही. कपिल महर्षीनी सांख्य मताची मांडणी केली आहे. सांख्य हा शब्द 'संख्या' या शब्दापासून निघाला आहे. याचा अर्थ गणना करणारे. सांख्यांनी मोजकी पंचवीस तत्वे सांगितली असल्याने त्याना 'मोजणारे' असे विशिष्ट नाव मिळाले. कपिलांनी लिहिलेली सांख्य सूत्रे आज उपलब्ध नाहीत. ईश्वरकृष्णाच्या 'सांख्य कारिका' हा सत्तर श्लोक असलेला लहानसा ग्रंथच आज प्रमाण मानला जातो. यावर गौडपादचार्य व वाचस्पतिमित्र यानी टीका लिहिल्या आहे. शंकराचार्यांनी आपल्या ब्रह्मसूत्रावरील भाष्यात सांख्यकारिकेतील अवतरणे दिली आहेत. सदर कारिकांचे इ.स.५७० मध्ये झालेले चिनी भाषेतील भाषांतर उपलब्ध आहे. सांख्य सूत्रांची रचना करणारे कपिल मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानस पुत्रापैकी एक होते. कपिलाचा शिष्य आसूरी त्याचा शिष्य पंचशिख अशी परंपरा ईश्वरकृष्णाने दिली आहे. सांख्यांनी सत्कार्यवादाची मांडणी केली आहे. या मतानुसार कारणातील गुणच कार्यात प्रकट होतात बौध्द व वैशेषिक यांच्या मते कारणाचा नाश होऊन कार्य जन्माला येते. पण सांख्यांना व वेदान्त्याना ही विचारसरणी मान्य नाही. कार्य हे कारणात लपलेलछे आते. प्रक्रियेत ते प्रकट होते. दुधापासून दही होते. ते पाण्यापासून अथवा इतर द्रव पदार्थापासून निर्माण होत नाही. हाच विचार सतापासून हे जग निर्माण झाले आहे, असता पासून नाही यात आढळून येतो. अर्वाचीन शास्त्रातही Ex nihilo nihil fit हा विचार मांडलेला आहे. याचा अर्थ अभावापासून काहीच निर्माण होत नाही. ( nothing comes out of nothing) असा होतो. गीतेतही - "नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । J उभयो रपि दृष्टोऽन्तस्त्वनयो स्तत्वदर्शिभिः ।। (गीता. २.१६ ) अर्थ : जे नाही ते अस्तित्वात येत नाही व जे आहे त्याचे अस्तित्व नाहीसे गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६८
Appearance