Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुध्दी हे सारे याच्यासाठीच काम करीत असतात. शरीरात असणारा मी तो हाच आहे. आप - पर भाव याच्यामुळे उत्पन्न होतो. इंद्रिये, मन, बुध्दी यांच्यावर याचेच - नियंत्रण असते. कित्येकांचे म्हणणे असे आहे 'आत्मा' म्हणून वेगळी गोष्ट नसून मन, बुध्दी, चेतना या सर्वांच्या समुच्ययास अथवा संघातास आत्मा असे नाव आहे. पण हे मत पटणारे नाही. गीतेलाही हे मत मान्य नाही. संघाताची गणना क्षेत्रातच करण्यात आली आहे. (गीता.१३.६) वृहदारण्यक उपनिषदात हात, पाय, प्राण, चेतना मन आणि बुध्दी यांच्या पलिकडे आत्मा आहे. असे म्हटले आहे. सांख्य आणि वेदांत मतास तसेच अर्वाचीन जर्मन तत्ववेत्ता कांट यास हा सिध्दांत मान्य आहे. सांख्यांनी आत्म्यास 'पुरुष' असे नाव दिले असून वेदांतात 'क्षेत्रज्ञ' असे म्हटले आहे इतकेच. आत्मा या क्षेत्रज्ञाचे मूळ स्वरूप काय आहे याचा निर्णय करण्यासाठी वेदांतशास्त्र प्रवृत्त झाले आहे. उपनिषदात गीतेत, वेदांतसूत्रात याच प्रश्नाचा निर्णय करण्यात आला आहे. अर्थात क्षेत्रज्ञाबरोबर सृष्टीत व्यापून राहिलेल्या अक्षरब्रह्माचाहि यात विचार येतो. व जे तत्व पिंडात म्हणजे शरीरात आहे तेच तत्व ब्रह्मांडात आहे, असे ठरविण्यात आले आहे. पाश्च्यात्न्य तत्वज्ञानी ग्रीन यानेहि असा दोन बाजूनी विचार केला आहे. पहिल्यास त्याने 'स्पिरिच्युअल प्रिन्सिपल इन नेचर' व दुसऱ्यास 'स्पिरिच्युअल प्रिन्सिपल इन मॅन' अशी नावे देऊन ती दोन्ही एकच आहेत, असे म्हटले आहे. (७) कापिल सांख्यशास्त्र किंवा क्षराक्षर विचार • या प्रकरणात त्यानी सृष्ट्युत्पत्तीचा विचार मांडला आहे. एका मूलतत्वापासून ही चराचर सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार वैशेषिक, सांख्य व वेदांत या तीन दर्शनात केलेला आहे. वैशेषिक दर्शनाची मांडणी कणाद या महर्षीनी वैशेषिक सूत्रांची रचना करुन केली आहे. यांच्या मते सृष्टी ही परमाणू पासून बनली आहे. पदार्थाचे तुकडे करता करता अशी वेळ येते की पुढे विभाजन शक्य होत नाही. त्या कणास परमाणू असे नाव आहे. परमाणूचा संयोग होऊन सृष्टी निर्माण होते. त्यांच्या या मतास आरंभवाद असे नाव आहे. सर्व पदार्थाचे परमाणू आकाराने जरी सारखेच तरी त्यांच्यात कमी जास्त गुण असतात. पृथ्वीच्या परमाणूत रूप, रस, गंध व स्पर्श हे चार पाण्याच्या परमाणूत गंधा गीता रहस्य : एक अध्ययन