मन हे अकरावे इंद्रिय त्यावर नियंत्रण ठेवते. बाह्य पदार्थाचे ज्ञान प्रथम इंद्रियांना होते, त्यांच्या मार्फत होते मनाकडून ते आत्म्यापर्यंत पोहोचते. अशी ही ज्ञानप्रक्रिया आहे. ज्ञानेंद्रियांचे ज्ञान त्याना स्वतःला होता आत्म्याला होते यास्तव आत्म्याला ज्ञाता असे म्हटले आहे. ज्ञानेंद्रियानी आणलेली माहिती मनाकडे आल्यावर त्यातील चांगल्या वाईटाची निवड मनाला करावी लागते. उदाः कानावर कर्कश आवाज आल्यावर किंवा दुर्गंध आल्यावर आपण चटकन कानावर हात ठेवतो. नाक दाबून धरतो. घड्याळात टोल पडू लागल्यावर त्याची बेरीज करून नऊ वाजले हे ठरवण्याचे काम मन करते. पशूंच्या कानावरही टोल पडतात पण किती वाजले हे त्यांना समजत नाही. म्हणुनच पशूना संस्काराचे पृथक ज्ञान होते. पण त्या ज्ञानतत्वातील एकत्वाचा बोध होत नाही. यास्तव गीतेत म्हटले आहे - 'इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुध्दि र्यो बुध्देः परतस्तु सः ॥ (गीता. ३.४२ ) अर्थ - स्थूल पदार्थापेक्षा इंद्रिये ही पलिकडची आहेत. असे म्हटलेले आहे. इंद्रियांच्या पलिकडे मन आहे. मनाच्या पलिकडे बुध्दी आहे. व बुध्दिच्या हि पलिकडे तो (आत्मा) आहे. शरीरात मन रुपी कारकून साधारणपणे तीन प्रकारची कामे करतो. (१) ज्ञानेंद्रियांनी आणलेल्या माहितीची जुळवाजुळव करणे (२) ग्राह्य व अग्राह्य यांचा निर्णय करणे. (३) ग्राह्य ती स्वीकारणे व अग्राह्य ती टाकून देणे ही तीन कामे मन करते. यानंतर मन ही जुळणी केलेली माहिती बुध्दीसमोर मांडते. व बुध्दी निर्णय घेण्याची कामे करते. न्यायाधीशाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही नाझर करतो. हे नाझरचे कामहि मनच करते. "1 विचार करण्याचे काम बुध्दी करते. टिळक लिहितात : या खेरीज बाकीची कामे बुध्दीची होती. आमच्या कल्पनांचा सारासार विचार मन करीत नाही. हा सारासार विचार करून कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान आत्म्यास करून देणे, किंवा निवडानिवड करून अमुक वस्तू कार्यकारण संबंध पाहून एखादे निश्चित अनुमान किंवा कार्याकार्य निर्णय करणे हे सर्व व्यापार बुध्दीचे आहेत व संस्कृतात या व्यापारास व्यवसाय किंवा अध्यव्यवसाय म्हणतात. " (पृष्ठ १२४) गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६४
Appearance