Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचरण करावे, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. अन्तःकरणाची अशी साक्ष काढण्याचा उल्लेख शांकुतलातही आला आहे. (पहा - संतां हि सन्देह पदेषुवस्तुषु प्रमाणमन्तः करण प्रवृत्तयः ।' अभि. १.२० ) - पण हा विचार वाटतो तितका सोपा नाही. ज्या मनाची साक्ष काढावयाची ते मन अत्यंत निर्मल असले पाहिजे. मनात जर विचार - विकारांची दलदल असेल, स्वार्थ, लोभ, काम यानी जर ते बरबटलेले असेल तर ते निःपक्षपाती निर्णय कसा घेणार? टिळकांनी या ठिकाणी आधिभौतिकवाद्यानी या आधिदैवत पक्षाचे कसे खंडन केले आहे, ते प्रथम थोडक्यात सांगितले आहे. एखाद्याने खून केला, असे ऐकल्या बरोबर आपण 'त्याने हे वाईट कृत्य केले, असे चटकन म्हणतो. हा निर्णय कोणताही विचार न करता दिला आहे. पण न्याय्य काम व अन्याय्य काय याचा निवाडा मन करु शकत नाही. ते काम आपली सदसद्विवेक बुध्दी करते. एखादा गणिती कुट प्रश्न झटकन सोडवतो किंवा निष्णात नेमबाज आवाजाच्या दिशेने गोळी झाडून लक्ष्यवेध करतो म्हणून या कौशल्याना कोणी देवता मानलेले नाही. त्यांची चिकाटी व अभ्यास हे त्यास कारण आहे, हे सहज समजते. दुसरे असे की देशोदेशीच्या चालीरीती वेगळ्या असतात, नीतीविषयक कल्पना भिन्न असतात. त्यामुळे सदसद्विवेक बुध्दीचे देशाचाराप्रमाणे भेद मानले तर तिच्या स्वयंभूपणास बाध येतो. हा आधिभौतिकवाद्यांचा निर्णय आपल्या शास्त्रकारांनाही मान्य आहे. या विचारास क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार असे नाव आहे. क्षेत्र म्हणजे शरीर व क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राचे ज्ञान असणारा आत्मा होय. हा विचार अध्यात्मशास्त्राचे मुळ असल्याने त्याचे स्वरुप संक्षेपाने असे मांडता येईल. मनुष्याची डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये शरीराबाहेरील वस्तूंचे ज्ञान करून देतात. रमणीय देखावा मधुर गाणे, उत्तम सुगंध, मखमली स्पर्श व रुचकर पदार्थ यांचे ज्ञान वरील इंद्रियाव्दारे होते. तर हात, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ म्हणजे कार्मेंद्रिय ही पाच कर्मेन्द्रिय आहेत. ज्ञानेंद्रिये ही बाहेरच्या पदार्थांचे ज्ञान करून देतात तर कर्मेंद्रिये शरीरातील द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम करतात. या स्तव टिळकांनी क्षेत्रास एक कारखानाच मानले आहे. गीता रहस्य : एक अध्ययन