é या प्रकरणाचा इत्यर्थ आहे. दृश्य सृष्टीकडे पाश्चात्य तत्वज्ञानी वस्तुनिष्ठ पध्दतीने पहातात. भारतात प्रारंभी आधिदैविक मताचा प्रभाव असला तरी लवकरच आध्यात्मिक पध्दतीने तिचे स्वरुप स्पष्ट करण्यात येऊ लागले. सृष्टीच्या मुळाशी एकच एक नित्य, शाश्वत चैतन्य तत्व आहे असे वेदांतात सांगितले आहे व ते सर्वमान्य झाले आहे. आत्मज्ञान होण्यासाठी सांख्यनिष्ठा व योगनिष्ठा असे दोन मार्ग गीतेत सांगितले आहेत. त्यालाच संन्यास आणि कर्मयोग अशी नावे आहेत. टिळकांनी गीतेला कर्मयोगशास्त्र मानले आहे. ते लिहितात, ' दृश्य दृष्टीचा किती जरी विचार केला तरी ही सृष्टी पहाणारा व 'कर्म करणारा कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्याचे या जगात परमकर्तव्य काय याचा विचार तात्विक दृष्टया अपुराच रहाणार म्हणून 'आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो निदिध्यासितव्यः " हा जो याज्ञवल्क्याचा उपदेश तोच प्रस्तुत प्रकरणी हि अक्षरशः लागू पडतो. अधिभौतिक वादी स्वतःला स्वतःच घालून दिलेल्या मर्यादेपलिकडे जाऊ शकत नाहीत. त्यास इलाज नाही. आमच्या शास्त्रकारांची दृष्टि याच्या पलिकडे गेलेली असून, अध्यात्मदृष्टयाच कर्मयोगशास्त्राची पूर्ण उपपत्ति त्यानी दिली आहे" (पृष्ठ ११३) ६) आधिदैवत पक्ष व क्षेत्र क्षेत्रज्ञ या सहाव्या प्रकरणात दुसऱ्या पंथाचा विचार केला आहे. सर्व सामान्य माणसाचा विचार केला तर कारुण्य, दया, परोपकार या वृत्ती त्याच्या ठिकाणी जन्मजात असतात. मुल रडू लागले की आई स्याला उचलून घेते. भिकारी दिसताच की आपण त्याच्या हातावर चार पैसे ठेवतो. या गोष्टी माणसाला कोणी शिकवाव्या लागत नाहीत आधिदैवत पक्षात या मनोवृत्तीकडे देवता म्हणून पाहिले जाते. थोडक्यात म्हणजे सद्गुणांच्या स्वाभाविक प्रवृत्ती या देवता आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पण दोन देवतात जर तंटा पटला मनाची साक्ष काढण्यात येते त्यामुळे मनोदेवता ही अधिक प्रबळ मानलेली आहे. महाभारतात धर्म, सत्य, शील या देवता प्रल्हादाच्या शरीरातून इंद्राच्या शरीरात गेल्याचा उल्लेख आहे. भगवव्दीतेत कीर्ती, श्री, वाक मेघा, स्मृती, धृती, क्षमा या देवता मानल्या आहेत. (गीता. १०.३४) आपल्या मनाला जे शुध्द वाटेल त्याचे गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६२
Appearance