Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याना नारदविद्यामंदीर पुणे या कीर्तनसंस्थेकडून भागवताचार्य शास्त्री ही पदवी व देवर्षी नारद कीर्तनकार हा पुरस्कार मिळालेला आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात मी अगदीच नवखा आहे. त्यामुळे त्यातील जाणकार व्यक्तीचे बोट धरुन मी या प्रदेशात पाऊल टाकीत आहे. त्यांची प्रस्तावना लाभल्याने मला धन्यता वाटत आहे. गीतारहस्याने किमान एक वर्ष तरी माझ्या डोक्यात ठाण मांडले होते. हे पुस्तक लिहून हातावेगळे झाल्यामुळे मनावरचे ओझे हलके झाले आहे. तथापि या थोर ग्रंथाच्या सहवायसात रहाण्याचा आनंद वेगळाच होता. त्या आनंदाला मुकावे लागणार याचे वाईट वाटत आहे. अशा या अलौकिक ग्रंथाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न अभ्यासकाना आवडेल अशी अपेक्षा आहे. गीता रहस्य : एक अध्ययन - लेखक 2058285239268995335