Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मृगजळाच्या मागे धावणाऱ्या हरणासारखा फुकट जातो. सुख या अर्थी हित, कल्याण, श्रेय, असेही शब्द योजण्यात येतात. या नैप्रायिकांनी ‘अनुकूल वेदनीयं सुखं, प्रतिकूलवेदनीयं दुःखम । अशी सुखदुःखाची लक्षणे सांगितली आहेत. आपल्याला हवेहवेसे वाटते ते सुख व नको वाटते ते दुःख असे सामान्यपणे समजायला हरकत नाही. वेदात्यांनी आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक असे सुखदुःखाचे तीन प्रकार सांगितले आहेत. देवतांच्या कृपेने अथवा कोपाने जी सुख दुःखे प्राप्त होतात, ती आधिदैविक, पंच महाभूतांशी इंद्रियांचा संयोग झाल्यावर मिळणारी सुखदुःखे ही आधिभौतिक व बाह्य संयोगाने प्राप्त न होणारी सारी मानसिक सुखदुःखे ही आध्यात्मिक मानलेली आहेत. यातील प्रकारापेक्षा शारीरिक व मानसिक हे दोन प्रकार मानणे अधिक योग्य आहे. सर्व प्रकारच्या शरीर सुखदुःखास आधिभौतिक व सर्व मानसिक सुखदुःखास आध्यात्मिक ही नावे आम्ही ग्रंथात योजिली आहेत. (पृष्ठ ९०) असे टिळकांनी म्हटले आहे. . सुखदुःखाविषयी लोकात अनेक समजुती प्रचलित आहेत. उदाः- आपल्याला खूप तहान लागल्यावर थंड पाणी पील्यावर तहान भागल्यामुळे सुख वाटते, किंवा पायात मोडलेला काटा काढल्यावर वेदना कमी होतात. त्यामुळे बरे वाटते, अशा प्रकारे दुःख दूर होणे म्हणजे सुख अशी काहींची कल्पना आहे. पण हा विचार योग्य नाही सुख हे दुःखाचा अभाव नाही, त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. हे स्पष्ट करण्यासाठी लोकमान्यानी अत्यंत मार्मिक उदाहरण दिले आहे. "एका मुलाच्या तोंडात अकस्मात खडीसाखरेचा एक खडा घातला तर त्यापासून त्याला होणारे सुख पूर्व तृष्णेच्या क्षयामुळे झालें असे म्हणता येत नाही.' (पृष्ठ ९३) " रुचकर पदार्थ खाल्ला, मनोहर देखावा पाहिला किंवा मधुर गाणे ऐकले तर इंद्रियांना होणारे सुख हे स्वतंत्र आहे. ते दुःखाचा अभाव नाही. हे झाले इंद्रियजन्य सुख, अत्यंत प्रियव्यक्तीची अकस्मात भेट झाल्यावर होणारा आनंद हा मानसिक आहे तर परीक्षेत मिळणारे यश किंवा शास्त्रीय संशोधकास सृष्टि नियमाचा लागलेला शोध व त्यामुळे होणारा आनंद हा बौध्दिक आहे. ही सुखे स्वतंत्र आहेत. अभावरूप नाहीत. त्यामुळे दुःखाचा अभाव म्हणजे सुख ही भ्रामक समजूत आहे, असे भर्तृहरीने गीता रहस्य : एक अध्ययन