Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

i श्लोकात या तीनही प्रकारचा उल्लेख केला असला तरी पहिल्या दोन्हींचा त्याने एकाच प्रकारात उल्लेख केला आहे. एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थान्यरित्यज्य ये सामसन्यास्तु परार्थयुध्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये । ते ऽ मी मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये" अर्थ –स्वार्थ सोडून जे परोपकार साधतात ते उत्तम पुरुष आहेत. स्वार्थाला 'विरोध येत नसेल तरच परोपकार करण्यास प्रवृत्त होतात, ते सामान्य दर्जाचे पुरुष आहेत. स्वार्थासाठी जे दुसऱ्यांच्या हितांचा बळी देतात ते मानवातील राक्षस आहेत. ( ४ ) पण समाजात असे ही लोक असतात की जे स्वार्थावर पाणी सोडून दुसऱ्याच्या सुखासाठी झटतात. भर्तृहरीने त्यांची उत्तम पुरुषांत गणना केलेली आहे. पण निव्वळ आधिभौतिक सुखवादी, निःस्वार्थपणे परोपकारार्थ झटणाऱ्या लोकांचा विचार करीत नाहीत. या पंथातील म्हणजे चौथ्या पक्षाने 'पुष्कळांचे पुष्कळ हित साधणे हे आपले उद्दिष्ट ठेवले आहे. एका माणसाच्या सुखाचा विचार न करता बहुजनांचा यात विचार केलेला असतो. वेग्रॅम, मिल हे या पंथाचे पुरस्कर्ते आहेत. या पक्षाचे मत अध्यात्मवाद्यांना बहुतांशी मान्य होण्यासारखे आहे, गीतेतही ज्ञानी पुरुषांचे लक्षण सांगताना सर्व भूतहिते रताः (गीता ५.२५ व १२.४) असे म्हटले आहे. तुकाराम महाराजांनी 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे उद्गार काढलेले आहेत. तथापि आधिभौतिक सुखवाद्यापेक्षा आपल्या शास्त्रकारांची दृष्टी अधिक व्यापक आहे. या मतातील कच्चे दुवे खाली दाखवले आहेत. एकतर पुष्कळ म्हणजे किती हे निश्चित नाही. याचा बहुसंख्य असा अर्थ घेतला तरी हा प्रश्न सुटत नाही. बहुसंख्य लोकांना एखादी गोष्ट हितकारक वाटली तरी दूरदर्शी पुरुषांना ती तशी वाटेलच असे नाही. सॉक्रे टीस व येशु ख्रिस्त हे लोकांच्या हिताचाच विचार करीत होते पण लोकांनी त्याना समाजाचे शत्रु ठरवून ठार मारले ही त्यांची कृती चुकीची होती हे आता सिध्द झाले आहे कडू औषध घेणे मुलाला कितीही आवडत नसले तरी बाप मुलाच्या हिताचा विचार करून त्यास औषध पाजीत असतो कायद्यातही शेकडो अपराधी सुटलेतरी चालतील पण एका निरपराध्यास शिक्षा होता कामा नये हे तत्व मान्य केलेले आहे. येथे शेकडो गीता रहस्य : एक अध्ययन +