Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) पण असला नागडा स्वार्थ फार काळ चालत नाही. स्वतःचा मतलब साधण्यासाठी का होईना माणसाला दुसऱ्यावा विचार हा करावाच लागतो. आपल्या स्वार्थ मुलक कृत्यात कोणी अडथळा आणू नये. अशी त्याची अपेक्षा असते. खऱ्या आधिभौतिक वादास या मतापासूनच प्रारंभ होतो. सामाजिक नीतीबंधने सर्वानी पाळायला हवीत. हे मत याना मान्य आहे. प्रदर्शन अहिंसेचा विचार केला तर है मत आणखी स्पष्ट होईल. अहिंसा या तत्वाच्या . मुळाशी 'मी दुसऱ्याला मारले तर तोही मला मारण्याची शक्यता आहे ही भीती असते. तो परोपकार करतो. दया दाखवतो, औदार्याचे प्रशऐन करतो या साऱ्या कृत्यांचा हेतू दुसऱ्याने हि आपल्याला उपकृत करावे हा असतो. अशा तऱ्हेने यांचा परोपकार हा स्वार्थमूलक असतो आई मुळाचे संगोपन करते यात तिचा हेतू मुळाने आपल्याला म्हातारपणी सांभाळावे हा असतो. इंग्लंडमधील हॉब्ज व फ्रान्समधील हेल्वेशियस हे या पंथांचे आहेत. दीनदुबळ्यावर आपण दया का करतो ? तर त्याचे दुःख पाहून आपल्याला मनाला खिन्नता येते व ती बोचते तिची बोच कमी होण्यासाठी तो दया करतो .बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क्प मैत्रीयीला म्हणतो, 'स्त्रीला नवरा जो आवडतो तो नवरा म्हणून नव्हे तर आत्मा प्रीत्यर्थ आवडतों. हे मत थोडे फार हॉब्जच्या मतासारखे दिसत असावे तरी त्याने म्हणजे याज्ञवल्क्याने काढलेला निष्कर्ष हा वेगवेगळा आहे. असले (३) आता स्वार्थ आणिा परार्थ या दोहोवर नजर ठेवून व्यवहार करणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. दुसऱ्याचे नुकसान न करता आपला फायदा करून घेणे ही यात कल्पना आहे. म्हणजे ती व्यक्ती केवळ आपला स्वार्थ न जहांता दुसऱ्याचाही विचार करते. मात्र यांचा स्वार्थ काय किंवा परार्थ काय दोन्ही लौकिक असतात, पारलौकिक सुखांचा यात विचार केलेला नसतो पण हे स्वार्थ आणिा परार्थ साधताना त्यात परस्पर विरोध आल्यास यांची पंचाइत होते. दुसऱ्यावर उपकार करीत असता आपले नुकसान होत असेल तर तो परोपकार प्रवृत्त न होण्याचीच शक्यता अधिक असते. भर्तृहरीने नीतीशतकातील ' एके सत्पुरुषाः परार्थ घटकाः (नीती.७४) या गीता रहस्य : एक अध्ययन