आपल्याकडे वैशेषिकांनी सृष्टीची द्रव्यादि सहा पदार्थात ( अभाव या सातव्या पदार्थाची मागाहून भर घालण्यात आली) विभागणी केली आहे. पण पुढे या विचारास वादविवाद शास्त्राची जोड देण्यात आल्याने शास्त्रीय प्रगती होऊ शकली नाही. पाश्च्यात्य विचारवंतांच्या मते नीतिशास्त्राचे विवेचन करण्यास अध्यात्म विचाराची अजिबात आवश्यकता नाही. कोणतेही कर्म हे चांगले की वाईट हे त्याच्या होणाऱ्या परिणामा वरुन ठरवले जाते. दृश्य परिणामाची कासोटी उपलब्ध असताना अध्यात्मशास्त्रात शिरण्याची काय गरज आहे? कर्माचे केवळ फल पाहून नीतिनियमांचा निर्णय करण्याच्या या पध्दतीस आधिभौतिक सुखवाद असे नाव आहे. कारण या पंथात इंद्रियजन्य सुखांचाच फक्त विचार करण्यात येतो. पुष्कळांचे पुष्कळ हित साधणे हे यांचे वैशिष्ट्य आहे. या पंथातील तीन चार मतांच्या पुढे गोषवारा दिला आहे. + (१) पहिला प्रकार स्वार्थी सुखवाद्यांचा आहे. यांच्या मते स्वार्थ हाच काय तो खरा आहे. आपल्या भौतिक सुखाची वृध्दी जेणे करुन होईल ते कर्म न्याय आहे. बाकी परलोक, परोपकार, त्याग या सान्या गोष्टी झुट आहेत. आपल्याकडे चार्वाकाने हेच मत मांडले आहे तो सांगतो की आपण जिवंत आहोत तो पर्यंत चैन करावी. त्यासाठी कर्जही काढावे. एकदा शरीराचे भस्म झाल्यावर कोण येथे परत येणार आहे ? रामायणात जावालीने रामास याच मताचा उपदेश केला आहे. महाभारतातील ‘कणिकनीती’ मध्ये हेच सांगितले आहे. पंच महाभूतानी बनलेला देह हाच महत्वाचा आहे. आत्मा हा त्याचाच भाग आहे. शरीर जळल्यावर आत्मा हि जळून जातो. सारांश आपल्या वासना तृप्त करणे हेच उद्दिष्ट असते. मीच काय तो खरा बाकि सारे जग खोटे हा अहंभाव असतो गीतेतील सोळाव्या अध्यायात आसुरी संपत्तीच्यालोकांचे जे वर्णन आहे, ते या पंथाच्या ज्रलोकांना लागू पडते. टिळक लिहितात - लोकांचे काही होवो केवळ आपल्या स्वतःचे विषयोपभोग सुख हाच परमपुरुषार्थ मानून निक्क्रीमत्तेला व धर्मरेला झुगारुन देणारी आधिभौतिक वाद्यांची ही अत्यंत कनिष्ट पायरी कर्मयोगशास्त्रावरीलसर्व ग्रंथकारांनी व सामान्य लोकांनीही आता अत्यंत अनीतीची, त्याज्य व ग्रहार्य ठरविली आहे, किंबहुना हा पंथ नीतिशास्त्र किंवा नीतिविवेचन या नावालाही पात्र नाही. (पृष्ठ ७३ ) - ! गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/५१
Appearance