Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्यातील कौशल्य म्हणजे योग होय. साम्यबुध्दी पेक्षा कर्म हे कनिष्ठ आहे. यासाठी बुध्दीला शरण जाऊन योगाचे आचरण करावे. निष्काम कर्मे करावीत. म्हणजे त्याचा लेप लागणार नाही. हीच ती युक्ती अथवा कौशल्य होय. आता गीतेत पातंजल योगाचे वर्णन का आले आहे ? अशी शंका येते. योगात इंद्रिय-निग्रह, चित्ताची एकाग्रता, ध्यानधारणा या गोष्टी येतात योगाचे यम, नियम, आसन, प्राणायाम, परूत्याहार धारणा ध्यान व समाधी अशी आठ अंगे आहेत. या मार्गाचा उपदेश चित्ताची एकाग्रता करुन बुध्दीचे समत्व साधण्यासाठी केलेला आहे. म्हणजेच कर्मयोगाचे हे साहाय्यक अंग आहे. ज्ञानमार्गातही हे साधन म्हणून उपयुक्त आहे. भ शंकाराचार्यानी योगः कर्मसु कौशलम या ओळीचा अर्थ योगो हि कर्मसु कौशलं स्वधर्मारव्येषु कर्मसु वर्तमानस्य या या यििध्दयं सिध्दयोः समत्वबुध्दिरीश्वरार्पितचेतस्तया तत्कौशलं कुशल भावः । तध्दि कौशलं यब्दन्धनस्वभावान्यपि कर्माणि समत्व बुध्दया स्वभावान्निवर्तन्ते । तस्मात्समत्वबुध्दियुक्तो भव त्वम । (गीता शां.भा.अ.२.५०) याचा अर्थ - कर्मामध्ये जी कुशलता आहे. त्याला योग म्हणतात. स्वधर्माने सांगितलेल्या कर्माचे आचरण करताना ईश्वराला समर्पित करण्याच्या बुध्दीमुळे उत्पन्न झालेला सिध्दी आणि असिध्दीमधील समत्व भावाला कुशलता असे म्हणतात. स्वाभाविकपणे बंधनात घालणारे जे कर्म आहे ते सुध्दा समत्व भाव बुध्दीमुळे आपला स्वभाव सोडून देते म्हणून तू समत्व बुध्दी प्राप्त कर. (अनुवादक - स. कृ. देवधर पृष्ठ ७७ ) - थोडक्यात योग म्हणजे कर्मयोग होय. असा टिळकांनी निष्कर्ष काढला आहे. भगवंतांनी स्वतःच आपल्या उपदेशास योग असे नाव दिले आहे. समत्वबुध्दी आणि कर्मातील कुशलता हीच कर्माचे बंधन नष्ट करतात. ही युक्ती गीताशास्त्रातील अपूर्वता आहे. कर्मयोगाचा उपदेश करणारा या अर्थानेच कृष्णास योगेश्वर असे म्हटलेले आहे. आता कर्म करणाऱ्या ज्या युक्त्या आहेत त्यातील सर्वात चांगली युक्ती अथवा मार्ग कोणा व तो आचरण्यास योग्य आहे काय ? या प्रश्नाची चर्चा ज्या शास्त्रात केलेली असते त्याला कर्मयोगशास्त्र असे म्हणतात. त्यामुळे या प्रकरणास दिलेले कर्मयोगशास्त्र हे नाव सर्वतोपरी सार्थ आहे, असे म्हणायला हरकत नाही. गीता रहस्य : एक अध्ययन