(१) विषयप्रवेश "श्रीमद्भगवतगीता हा आमच्या धर्मग्रंथापैकी एक ठ अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे'. या सुंदर वाक्याने लोकमान्यानी या प्रकरणास प्रारंभ केला आहे. या सात आठ ओळीच्या परिच्छेदात त्यानी गीतेची उत्कृष् ओळख करून दिली आहे. या पुस्तकात तो परिच्छेद पूर्ण उद्धृत केला असल्याने अधिक सांगण्याची जरुरी नाही. - गीता हा ग्रंथ अत्यंत बहुमोल आहे. उपनिषदांचे सार असलेला हा केवळ सातशे श्लोकांचा ग्रंथ वेदान्त तत्वज्ञानाची उत्कृष्ठ ओळख करून देणारा आहे. युध्द संपल्यानंतर पुढे एकदा अर्जुनाने कृष्णाला पुन्हा गीता सांगण्याची विनंती केली. तेव्हा सदर उपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्ताने केला असल्यामुळे तो पुन्हा तसाच सांगणे मलाही अशक्य आहे. असे कृष्णाने उत्तर दिले. यावरुन या ग्रंथाची थोरवी ध्यानात येते. या ग्रंथाचे सर्व भाषातील सर्व भाषात भांषांतर झाले आहे. इतकेच नव्हे तर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, लॅटीन इत्यादी भाषातून गीता सर्व जगभर गेली आहे. हेही तिच्या थोरवीचे गमक म्हणावे लागेल. अनुवादाप्रमाणे अनुकरण हेही तिची थोरवी सांगणारे आहे. ईश्वरगीता, उत्तरगीता, कपिलगीता, गणेश गीता, देवीगीता, पांडवगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, अशी गीतेची अनेक अनुकरणे झाली आहेत. गीतारहस्यात अशा एकंदर सव्वीस गीतांची नावे दिली आहेत. त्यात काहीत अद्वैतमताचे तर काहीत विशिष्टद्वैत मताचे प्रतिपादन आढळते. या गीतातून भगवद्गीतेतील काही श्लोक घेतलेले आढळतात त्यामुळे या नकली गीता मूळ गीताग्रंथाच्या पासंगालाही पुरणाऱ्या नाहीत म्हणूनच टिळक म्हणतात, 'ज्ञानदृष्टया पाहिले तर भगवद्गीतेपेक्षा या गीतातून काही विशेष नसून अध्यात्मज्ञान व कर्म यांची जाड घालण्याची भगवद्गीतेची जी अपूर्व शैली ती तर यापैकी कोणत्याही गीतेत आढळून येत नाही.' (पृष्ठ ५ - -६) यानंतर त्यानी महाभारतकाराना अभिप्रेत असलेले गीतेचे तात्पर्य स्पष्ट केले आहे. महाभारतात नारायणी अथवा भागवतधर्माचे निरुपण आहे गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी सूर्य, मनु, इक्ष्वाकू ही परंपरा सांगितली आहे. भागवतधर्मातही हीच परंपरा दिली आहे. त्यामुळे भागवतधर्म व गीता ही एकच आहेत आणि हा धर्म हरिगीतेत सांगितलेला आहे असे महाभारतात म्हटले आहे (म.भा. शांति ३४६.१०) गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/४०
Appearance