Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) महाभारतांतर्गत गीता यात शैलीचे चढ-उतार आढळतात. टिळक लिहितात : 'उदाहरणार्थ कर्णपर्वातील कृष्णार्जुनांचे वर्णन पाहिले तर त्यातील भाषासरणी इतर प्रकरणातील भाषेतून निराळी आहे, असे दिसून येईल. म्हणून गीतेची व महाभारताची भाषा जुळते की नाही. हे निश्चित सांगणे दुर्घट होय.' (पृष्ठ ४७३). तथापि त्यांनी दोहोत आढळणारे श्लोकांचे अंश पृष्ठ ४७५ ते ४७७ वर कोष्टक रुपाने दिले आहेत. ले पाहिल्यावर गीता महाभारतात मुळातच असावी असे वाटल्याखेरीज रहात नाही. गीता ही भीष्मपर्वात अध्याय पंचवीस ते बेचाळीस मध्ये आलेली आहे, त्याच्या अगोदरचे एकवीस ते चोवीस हे चार अध्याय वाचले म्हणजे विसंगती जाणवते. आणि अर्जुनास युध्द प्रसंगी मोह का व्हावा असा प्रश्न पडतो. त्यासाठी या चार अध्यायाचा सारांश विचारात घेऊ. एकविसाव्या अध्यायात दुर्योधनाची अवाढव्य सेना पाहून युधिष्ठिराला चिंता वाटू लागली. असे म्हटले आहे. तसेच भीष्मानी सैन्याचा अगदी अभेद्य असा व्यूह रचला होता. आता आपल्याला जय कसा मिळेल अशी शंका त्याने अर्जुनासमोर बोलून दाखविली. पण त्यावेळी अर्जुनाने त्याला धीर दिला. कृष्ण हा आपल्या पक्षाला आहे. त्यामुळे आपल्याला जय हा मिळणारच. जिकडे कृष्ण तिकडे जय अशी त्याची ख्याती आहे. तो सनातन पुरुष आहे. त्याच्याच कृपेने इंद्रादि देवाना त्रैलोक्याचे राज्य प्राप्त झाले. त्यामुळे आपल्याला जय मिळेल की नाही, अशी शंका घेण्याचे कारण नाही. बावीसाव्या अध्यायात युधिष्ठिराला धीर आला व त्याने भीष्माने रचलेल्या व्यूहास तोंड देण्यासाठी आपल्या ही सैन्याची रचना केली. मग तो वैभवशाली रथात बसला. त्याच्या मस्तकावर हस्तिदंती दांडा असलेली छत्री होती. मग अर्जुनही रथात बसला. त्याच्या रथाचे घोडे शुभ्र होते. चाके सुरेख व मजबूत होती. तो रथ जांबूनद जातीच्या सोन्याने मढवलेला होता. त्यामुळे तो झळकत होता. भगवान कृष्ण हे त्याचे सारथी होते व मारुती त्याच्या ध्वजावर होता. त्याच्या हातात गांडीव धनुष्य गीता रहस्य : एक अध्ययन .. २४