Jump to content

पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालो आहोत. तेव्हा मी आता लढणार नाही. मला कौरवांनी ठार मारले तरी हरकत नाही. असे म्हणुन अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले व रथात स्वस्थ बसून राहिला. (गीता अ. १-२६ ते ४७) अशाप्रकारे करुणेने व्याकूळ झालेल्या व निष्क्रिय बनलेल्या अर्जुनाकडे कृष्णाने एकवार पाहिले व तो म्हणाला : "असे तुला यावेळी कसली दुर्बुध्दी सुचली आहे ही संकटाची वेळ आहे. या तुझ्या वागण्याने तुला स्वर्ग मिळणार नाही. दुष्कीर्ती होईल. हे वागणे आर्यांना शोभणारे नाही. म्हणुन सांगतो हा नामर्दपणा सोड. मनाची दुबळी वृत्ती टाकून युध्दाला उभा रहा.' " कृष्णाने असे फटकारले तरी अर्जुनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो कृष्णाला म्हणाला” – हे मधुसुदना, मी पितामह भीष्माचार्य व गुरु द्रोणाचार्य या पूज्य व्यक्तींवर बाण कसे टाकू ? त्यांच्याशी युध्द कसे करु ? अशा पूजनीय गुरुजनाना मारण्यापेक्षा भिक्षा मागून पोट भरणे मला अधिक कल्याणकारी वाटते. मला असली रक्तरंजित संपत्ती व सुखोपभोग नको आहेत. या प्रसंगी नेमके काय करावे, हेच मला समजत नाही. युध्दात ते विजयी होतील की आम्ही, हेही अनिश्चित आहे. ज्यांना मारुन सुखाने जगावे, अशी आमची इच्छा नाही. ते धृतराष्टाचे पुत्र हे • आमच्या समोर युध्दाला उभे आहेत. कृष्णा, मी किंकर्तव्यमूढ झालो आहे. तुला शरण आलो आहे. तेव्हा माझे कल्याण कशात आहे ते मला सांग". (अ.२. श्लोक ३ ते ८) अशाप्रकारे दीन झालेल्या अर्जुनास उपदेश करण्यास कृष्णाने प्रारंभ केला हा उपदेश या अध्यायात सुरु होऊन अठराव्या अध्यायाच्या अखेरीस समाप्त झाला आहे. मात्र हा उपदेश तार्किक पध्दतीचा नाही. तो संवाद रुपाने केलेला आहे. अर्जुनाने मधुन मधून प्रश्न विचारले आहेत तसेच संजयाचेही निवेदनपर श्लोक आहेत. या उपदेशाच्या निमित्ताने गीतेत मनुष्याची कर्तव्ये, ईश्वर, जीवात्मा, सृष्टी यांचे स्वरुप स्पष्ट केले आहे. तसेच ज्ञानमार्ग (सांख्य) व कर्ममार्ग (योग) याची चर्चा आली आहे. यज्ञयाग, ध्यानयोग, क्षराक्षर विचार क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार, स्थितप्रज्ञाची लक्षणे, निष्काम कर्माचे आचरण लोकसंग्रह ज्ञानाची लक्षणे, ज्ञान, कर्म व भक्ती यांचे सात्विक राजस व तामस प्रकार दैवी व आसुरी संघ अशा अनेक विषयांची गीतेत संपदा गीता रहस्य : एक अध्ययन